मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाळूमाफिया व सराईत गुन्हेगार आकाश ऊर्फ भैया संजय रोकडे (वय २६, रा. मुडवी, ता.मंगळवेढा) यास एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करून येरवडा जेल येथे रवाना केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी केली आहे.
आकाश ऊर्फ भैया संजय रोकडे हा पंढरपूर तालुका हद्दीतील आझेवाडी व मंगळवेढा शहर आसपासच्या परिसरात भीमा नदी व माण नदीपात्रातून वाळू चोरी करून त्याची विक्री करत होता. वाळूविक्रीतील पैशांतून त्याने सर्वसामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण केले होते.
त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पाठवला होता.
त्यांनी त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश केल्याप्रमाणे त्याला १५ ऑगस्टच्या मध्यरात्री कारागृहात पाठवले आहे. येरवडा (पुणे) येथील स्थानबद्ध करण्यासाठी पाठवले आहे.
पंढरपूर तालुका मंगळवेढा पोलीस ठाणे अंतर्गत एकूण सहा गुन्हे भैया रोकडे याच्याविरुद्ध दाखल आहेत.
ही कारवाई पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, भारत भोसले, विक्रम वडणे, दत्तात्रय तोंडले, सहायक फौजदार विजयकुमार गायकवाड, हेड कॉन्स्टेबल अनिस शेख, पो.हे.कॉ. मंगेश रोकडे,
दीपक भोसले, सागर गवळी, संजय गुटाळ, हासेन नदाफ, घाडगे, विजयकुमार आवटी, हवालदार रतन जाधव, वसंत कांबळे यांच्या पथकाने केली.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज