टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले अशोक बाबर व मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील सहाय्यक फौजदार सलीम शेख या दोघा कर्मचाऱ्यांना पोलिस उपनिरिक्षकपदी बढती मिळाल्याचे पत्र नुकतेच पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील सहाय्यक फौजदार अशोक बाबर हे १ सप्टेंबर २०२१ पासून येथे कार्यरत आहेत. ते १९९१ मध्ये पोलिस खात्यात भरती झाले असून
त्यांचे मुळ गाव आलेगाव ता.सांगोला हे आहे. त्यांनी आत्तापर्यंत पोलिस अधिक्षक कार्यालय, मोहोळ, पंढरपूर शहर , सांगोला , टेभुर्णी आदी ठिकाणी सेवा बजावली आहे.
सहाय्यक फौजदार सलीम शेख मंगळवेढा पोलिस ठाण्याकडे सन २०२१ पासून कार्यरत आहेत.
सहाय्यक शेख हे १९८४ मध्ये पोलिस खात्यात रूजू झाले. त्यांना २०१८ मध्ये सहाय्यक फौजदारपदी बढती मिळाली.
त्यांनी मंद्रुप , सोलापूर तालुका , फौजदार चावडी , अक्कलकोट , वैराग , पांगरी , टेंभुर्णी , करमाळा , मंद्रूप , मोहोळ आदी ठिकाणी सेवा बजावली असून ते मुळचे पांगरी (ता.बार्शी ) ते येथील आहेत.
फौजदार सलीम शेख व सहाय्यक फौजदार अशोक बाबर या दोघांना पोलिस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी पोलिस उपनिरिक्षकपदी बढती दिल्याचा आदेश प्राप्त झाला आहे.
दरम्यान, या दोघांचे पोलिस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव, डी.वाय. एस. पी . राजश्री पाटील, पोलिस निरिक्षक रणजित माने व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज