टीम मंगळवेढा टाईम्स ।
प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे यांनी मंगळवेढा-पंढरपुरचे आमदार समाधान आवताडे यांच्या फार्म हाऊस वरती जाऊन भेट घेतली आहे.
दरम्यान, आमदार समाधान आवताडे व नागराज मंजुळे यांच्या भेटीमागे सदिच्छा भेट असल्याचे बोलले जात आहे.
कालच दामाजी कारखाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासंदर्भात दामाजी कारखान्याचे चेअरमन व आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत फार्महाऊसवरती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
दोन जिवलग मित्रांची भेट
आमदार समाधान आवताडे व नागराज मंजुळे हे दोघेजण चांगले मित्र आहेत. आपल्या कामानिमित्त मूळ गावी आले असल्याने आमदार आवताडे हे मंगळवेढ्यात असल्याचे त्यांना समजल्याने ते भेटायला आले होते.
नागराज मुंजुळे यांची पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म चांगलीच गाजली होती. त्यानंतर त्यांनी फँड्री, सैराट सारखे एकाहून एक सरस चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले.
सैराट या चित्रपटाने तर आजवरचे मराठी चित्रपटांचे सगळेच रेकॉर्ड मोडले आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सैराट या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, या चित्रपटाची गाणी, लोकेशन्स सगळे काही प्रेक्षकांना प्रचंड भावले.
सध्या नागराज मंजुळे यांचा झुंड हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची त्यांनी निर्मिती करण्यासोबतच चित्रपटात काम देखील केले आहे.
नागराज यांनी आज केवळ मराठी इंडस्ट्रीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची अनेक कलाकारांची इच्छा आहे. नागराजने आज इतके यश मिळवले असले तरी त्यांचे पाय आजही जमिनीवर आहेत.
नागराज हे मुळचे सोलापूरमधील असून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या गावात ते लहानाचे मोठे झाले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज