मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
गावागावांत उत्साह, अधिकारी-ग्रामस्थांचा हातात हात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत मंगळवेढा तालुक्यात जनजागृती, संवाद आणि महाश्रमदानाच्या उपक्रमांनी ग्रामविकासाची नवी चळवळ निर्माण केली आहे.

१५ व १६ ऑक्टोबर २०२५ रोजी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमध्ये अधिकाऱ्यांनी मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधला.

पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. जस्मिन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडले.

पहिल्या दिवशी अधिकाऱ्यांनी गावोगावी मुक्काम करून करभरणा, स्वच्छता आणि ग्रामसहभागाचे महत्त्व पटवून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ते १० या वेळेत सर्व ग्रामपंचायतींमध्ये महाश्रमदान शिबिरे आयोजित करण्यात आली.

या श्रमदानातून स्वच्छता, वृक्षारोपण, नाल्यांची साफसफाई, पाणी संवर्धन, आणि सार्वजनिक स्थळांचे सौंदर्याकरण असे विविध उपक्रम राबवण्यात आले.

महिला बचतगट, युवक, ग्रामसभा, मंडळे, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

अभियानात शिक्षणाधिकारी कादर शेख, उपअभियंता अतुल लेंडवे, उपअभियंता प्रसाद काटकर, तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब जानकर, गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता, कृषी अधिकारी आर. पी. कांबळे,

तसेच विस्ताराधिकारी अशोक नलावडे, आर. एस. मिसाळ, एस. एस. कांबळे, एच. एस. नरळे, पी. आर. च्या चाबुकस्वार, एस. ए. चलवादी, एस. के. शिंदे, बी. ए. रणदिवे, संदेश अर्धाले, डी. एस. नाईकनवरे, ए. एम. डोरले आणि श्रीनिवास शेराला यांनी समन्वय साधला.

या अभियानात या गावांचा समावेश
ब्रह्मपुरी, मारापूर, आंधळगाव, माचणूर, गोणेवाडी, लवंगी, शिरनांदगी, मल्लेवाडी, शिरसी, ममदाबाद, हुन्नूर, तळसंगी, मारोळी, भालेवाडी, भोसे, येड्राव, सोड्डी, लोणार, ढवळस, कर्जळ, कात्राळ, हिवरगाव, अकोला अशा २१ ग्रामपंचायतींमध्ये अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली.
ग्रामपंचायत करभरणा वाढवणे, दिव्यांग निधीचा योग्य वापर, जलसंधारण आणि वृक्षसंवर्धन याविषयी ग्रामस्थांना डॉ.जस्मिन शेख यांनी मार्गदर्शन केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













