टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी सोलापूर जिल्ह्यात आजपासून ते १४ मार्चपर्यंत रुक्मिणी सप्ताह राबविला जाणार आहे.
या सप्ताहाच्या माध्यमातून महिला बचत गटांचे सक्षमीकरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
दि.९ मार्च रोजी उत्पादकांची तालुकास्तरीय कार्यशाळा, दि.१० मार्चला गावस्तरावर कार्यशाळा, दि.११ मार्चला तालुकास्तरावर एफएसएसआय उद्यम आधार मोहीम व पॅकिंग – लेबलिंग कार्यशाळा,
दि.१२ मार्चला उपजीविका कार्यालयाशी कृती संगम कार्यक्रम विषयक शासकीय विविध दि.१३ मार्चला तालुकास्तरावर उपजीविका विषयक कर्ज मिळविण्यासाठी मेळावा,
दि.१४ मार्चला गावस्तरावर समूह उत्पादनांचे आठवडा बाजार व स्वयंसहायता समूहाला ऑनलाईन मार्केटिंग (अमेझॉन , फ्लिपकार्ड जेम आदी) नोंदणी केली जाणार आहे.
मिळवून देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्वयंसहायता समूहातील उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीचेही आयोजन केले जाणार आहे.
या अभियानात जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्वयंसहायता समूहाने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अभियान व्यवस्थापक स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी सचिन चवरे यांनी केले आहे.
ठळक बाबी
सोलापूर जिल्ह्यातील स्वयंसहायता समूह : २१ हजार ६८७
स्वयंसहायता समूहातील सदस्य : दोन लाख २७ हजार ६५३
पात्र समूहांना झालेले कर्जवाटप : ५८४ कोटी ८५ लाख
उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार
सोलापूर जिल्ह्यातील महिला बचत गट खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन निर्मिती करत आहेत. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी व व्यावसायिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. या अभियानात जास्तीत जास्त समूहांनी सहभाग घ्यावा. – संतोष धोत्रे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज