मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी दुर्बल आणि वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) यामध्ये आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असते.
‘आरटीई’ 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत (लॉटरी) 14 फेब्रुवारी 2025 रोजी शालेय शिक्षण आयुक्त यांच्या उपस्थितीत काढण्यात आली होती.
त्यानुसार आरटीई 25 टक्के प्रवेशासाठीची निवड यादी 14 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येत असून लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या प्रवेश घेण्यासाठी 14 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत कालावधी देण्यात आली होती. पण आता प्रवेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे.
10 मार्चपर्यंत मुदतवाढ
आरटीई प्रवेश प्रक्रियेस शिक्षण विभागाकडून 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे काही कारणास्तव प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशास वेळ मिळणार आहे. प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.
मात्र, केवळ 47 हजार विद्यार्थ्यांनीच दिलेल्या मुदतीत प्रवेश घेतले होते. त्यामुळे प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाण्याची मागणी केली जात होती.
निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति घेऊन जाव्यात
तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी काढून घ्यावी. पालकांनी आपल्या बरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.
‘आरटीई’ 25 टक्के लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांचे कागदपत्र पडताळणी करण्यासाठी राज्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
या समितीमार्फत कागदपत्राची प्राथमिक तपासणी करुन योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करण्यात येईल. तसेच पालकाकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला अशी नोंद करण्यात येऊन पालकांकडून हमीपत्र भरुन घेण्यात येईल.
आरटीई प्रवेशासाठी सोलापूर जिल्ह्यातील 286 शाळा पात्र ठरल्या असून, त्या शाळेमध्ये दोन हजार 443 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. एक हजार 17 जणांनी प्रवेश घेतला आहे. अद्यापही एक हजार 424 जणांचा प्रवेश बाकी आहे.
आरटीई प्रवेशासाठी 28 फेबु्रवारी प्रवेशासाठी शेवटची संधी होती. शासनाने दिलेल्या मुदतीमध्ये फक्त चाळीस टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यामुळे शासनाकडून प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत उर्वरित विद्यार्थ्यांनी आरटीईसाठी प्रवेश घेणे गरजेचे आहे.
प्रवेश घेतलेले तालुकानिहाय विद्यार्थी
अक्कलकोट – 34, बार्शी -144, करमाळा – 86, माढा -83, माळशिरस – 162, मंगळवेढा – 31, मोहोळ – 80, पंढरपूर – 127, सांगोला -00, उत्तर सोलापूर – 8, दक्षिण सोलापूर – 72, सोलापूर शहर – 190 असे एकूण 1017 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
आरटीईच्या शिल्लक जागा
अक्कलकोट – 54, बार्शी – 166, करमाळा – 70, माढा – 154, माळशिरस – 116, मंगळवेढा – 46, मोहोळ – 70, पंढरपूर – 202, सांगोला – 192, उत्तर सोलापूर – 151, दक्षिण सोलापूर – 62, सोलापूर शहर – 141 अशा एकूण 1 हजार 424 जागा शिल्लक आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज