टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहर परिसरात दरोडेखोरांनी एका बंगल्यावर दरोडा टाकून संजय भाऊराव हजारे यांना गजाने मारहाण करून सोन्याची फुले, मणीमंगळसुत्र ख रक्कम असा ५८ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
दरम्यान , जखमी संजय यास उपचारासाठी पंढरपूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनास्थळाला पोलिस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी भेट देवून तपासाबाबत पोलिसांना मार्गदर्शन केले.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील फिर्यादी सुवर्णा संजय हजारे ( वय ३८ ) व जखमी पती संजय हे जेवण करून बंगल्यातील हॉलमध्ये झोपले होते.
दि.७ च्या पहाटे ३.०० ते ३.१५ च्या दरम्यान सहाजण असलेल्या दरोडेखोरांनी बंगल्याचा पाठीमागील दरवाजा उचकटून बंगल्यात प्रवेश केला.
दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने घेत असताना संजयने विरोध केल्याने दरोडेखोरांनी त्यास लोखंडी गजाने, काठीने मारहाण केल्याने त्यांचा या मारहाणीत हात मोडून ते गंभीर जखमी झाले.
यावेळी त्यांची पत्नी तथा फिर्यादी दागिने घेवून जावा , मात्र मारू नका असा मोठमोठयाने आक्रोश करीत असतानाही दरोडेखोर मारहाण करीत होते.या आवाजामुळे शेजारी राहणाऱ्या बालिका दादा सावंत या जाग्या होवून त्यांनी खिडकीतून डोकावन पाहिले असता त्यांना बाहेर उभे असलेले दरोडेखोर दिसले.
दरोडेखोरांनी शेजारी बाहेर येवू नयेत याची दक्षता घेत त्यांच्या घराला बाहेरून कडी लावली होती.
बालिका हिने बाहेरील लाईट लावताच त्यांच्या बंगल्यावर दगडफेक करीत ऊसाच्या फडात पलायन केल्याचे सांगण्यात आले.
तत्पुर्वी दरोडेखोरांनी प्रकाश शिंदे यांच्या पाठीमागील दार उघडून घरात प्रवेश केला. झोपलेल्या कुटुंबाने बाहेर येवू नये यासाठी त्यांनी येथेही बाहेरून कडी लावली होती. येथील कपाटात मुद्देमाल शोधाशोध केला मात्र काही मिळून न आल्याने जाताना दिसलेली सुटकेस घेवून गेले.व दूरवर त्यांनी ती सुटकेस उघडून पाहिल्यानंतर आतमध्ये मुद्देमालाऐवजी केवळ कागदच दिसल्याने निराशजनक दरोडेखोरांनी आपला मोर्चा हजारे यांच्या बंगल्याकडे वळवून आपले काम फत्ते केले.
प्रकाश शिंदे यांच्या घराकडे येताना दोन ठिकाणी खाजगी सी.सी.टि.व्ही . कॅमेरे होते. हे फुटेज पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
दरोडेखोर हे सहाजण असून त्यांनी अंगात बरमोडा, टी शर्ट , व तोंडाला बांधलेल्या स्थितीत असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिस प्रशासनाने सोलापूरहून श्वान पथक मागविले होते.
हे श्वान घटनास्थळापासून शहरालगत असलेल्या बायपास रोडकडे गेल्याने ते चार चाकी वाहनातून गेले असावेत असा अंदाज आहे. घटनास्थळाला पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते , डी.वाय . एस.पी.राजश्री पाटील , पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे आदीनी भेट देवून पाहणी केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज