टीम मंगळवेढा टाईम्स ।
लोकप्रतिनिधींना डावलून मंगळवेढा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आढावा बैठकीत विविध खात्याअंतर्गत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
केवळ अधिकारी व कर्मचारीच बैठकीला बोलवल्यामुळे कर्मचाऱ्यांनी ही ठरवून उत्तर देत, तुम्ही मारल्यासारखं करा आम्ही रडल्यासारखा करतो अशाप्रकारे आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीतून काय साध्य केले ? हा प्रश्न विविध गावच्या सरपंच व लोकप्रतिनिधी कडून विचारला जात असून खऱ्या गावपातळीवर काय समस्या आहेत , हे गावात राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांना माहीत आहेत, आम्हालाही आढावा बैठकीला बोलवायला हवं होतं आशा प्रतिक्रिया विविध गावच्या सरपंचांमधून उमटत होत्या.
दरम्यान आमदार समाधान आवताडे यांनी पुन्हा बैठक लावून जनतेमधून या अधिकाऱ्यांचा आढावा घेण्याची सोय करणार असल्याचा इशारा यावेळी दिला आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रोजगार हमी, पशुसंवर्धन, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, एकात्मिक बाल विकास या सर्व विभागाच्या खाते प्रमुख व कर्मचाऱ्यांची विविध विकास कामांचा आढावा बैठक मंगळवारी मंगळवेढा येथील रजपूत या मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला कमालीची गुप्तता पाळत अधिकारी व कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एकाही पदाधिकाऱ्याला व माध्यमांना याची कुणकुण पंचायत समिती प्रशासनाने लागू दिली नाही.
सध्या सत्तेत असलेले आमदार समाधान आवताडे यांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नसल्याचे समजते. केवळ तालुक्याचे अधिकारी घेऊन सीईओ दिलीप स्वामी हे कोणता विकास साधणार आहेत? अशा प्रतिक्रिया लोकप्रतिनिधीकडून उमटत होत्या.
सध्या तालुक्यात अनेक समस्या भेडसावत आहेत भोसे , आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद आहेत, अनेक गावातील गाव पातळीवरील पाणीपुरवठा योजना बंद आहेत.
ग्रामपंचायत अंतर्गत पंधरावा वित्त आयोग, १४ वा वित्त आयोग, पावसाळ्यात विविध रोगराई रोखण्यासाठी फवारण्या, ग्रामसेवक यांची गावात हजेरी,
रमाई घरकुल योजनेअंतर्गत रोजगार हमीच्या अनुदानापासून अनेक लाभार्थी वंचित, बांधकाम विभाग अंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था, शिक्षण विभागातील ११५ रिक्त शिक्षकांचा प्रश्न,
एकात्मिक बालविकास अंतर्गत कुपोषण, पोषण आहार, पशुसंवर्धन विभागातील सध्या जनावरांना लंपी लस याबाबतची अधिकची सीईओ दिलीप स्वामी यांना समजणे गरजेचे होते असेही बोलले जात आहे.
बैठकीबाबत माहिती देण्यात आली नाही ; पुन्हा बैठक लावून जनतेमधून या अधिकाऱ्यांचा आढावा घेण्याची सोय करणार
मंगळवेढ्यात झालेल्या सीईओ दिलीप स्वामी यांच्या आढावा बैठकीची कोणतीही माहिती मला देण्यात आली नाही. किमान गावच्या सरपंचांना तरी या बैठकीला बोलावणे आवश्यक होते. केवळ कर्मचाऱ्यांना बोलावून स्वामी यांनी कशाचा आढावा घेतला याची माहिती घेऊन, गरज पडल्यास पुन्हा बैठक लावून जनतेमधून या अधिकाऱ्यांचा आढावा घेण्याची सोय करतो. • समाधान आवताडे, आमदार पंढरपूर मंगळवेढा.
अचानकपणे बैठकीचे झाले नियोजन
आढावा बैठकीचे अचानकपणे नियोजन करण्यात आले . जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे बैठकीसाठी संबंधितांना कळविण्यात आले होते. सुरू असलेल्या कामांचा आढावा यामध्ये घेण्यात आला.- शिवाजी पाटील , गटविकास अधिकारी , मंगळवेढा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज