मंगळवेढा टाईम्स न्युज ।
पंचायत समितीच्या नामांकन फॉर्मसाठी २०० रुपयांची लाच घेताना कवठेमहांकाळ तहसील कार्यालयातील महसूल सहायकाला रंगेहाथ पकडले.

सुभाष बाबासाहेब पाटील (वय ५४, रा.इरळी, ता. कवठेमहांकाळ) असे त्याचे नाव असून त्याच्यावर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

तक्रारदार त्यांच्या पत्नीच्या नावे पंचायत समिती निवडणुकीचे नामांकन फॉर्म घ्यायला तहसील कार्यालय, कवठेमहांकाळ येथे गेले होते.

तक्रारदारांनी मंगळवारी तहसील कार्यालयात जाऊन नामांकन फॉर्म वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे चौकशी केली असता, त्याने प्रत्येक फॉर्मसाठी १०० रुपये दिले पाहिजेत, असे सांगितले.

तक्रारदारांनी विचारले की, त्या १०० रुपयांची पावती दिली जाईल का? यावर कर्मचाऱ्याने कोणतीही पावती दिली जात नसल्याचे सांगितले. तो कर्मचारी प्रत्येक उमेदवाराकडून प्रत्येक नामांकन फॉर्मसाठी १०० रुपये घेत होता, परंतु पावती आणि नोंद न घेता ती रक्कम लाच स्वरूपात स्वीकारत होता. तक्रारदारांनी बुधवारी याबाबत तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारावर तहसील कार्यालयात पडताळणी केली असता, सुभाष पाटील (महसूल सहायक) यांनी तक्रारदारांच्या पत्नीच्या नावावर पंचायत समिती निवडणुकीचे दोन नामांकन फॉर्म देण्यासाठी प्रत्येकी १०० रुपये प्रमाणे २०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांकडून २०० रुपये लाच स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपाधीक्षक यास्मिन इनामदार, पोलिस निरीक्षक किशोरकुमार खाडे, पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण, पोलिस अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, सुदर्शन पाटील, सीमा माने, सागर नायकुडे यांच्या पथकाने केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












