टीम मंगळवेढा टाईम्स।
मोसमी नैऋत्य वाऱ्यांनी दिशा बदलली असून ते २४ सप्टेंबरला राजस्थान आणि गुजरातच्या बहुतांश भागातून माघारी परतण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हजेरी लावली.
येत्या तीन दिवसांत म्हणजे २५, २६ व २७ सप्टेंबरला राज्याच्या बहुतांश भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून ठाणे व नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
धरणक्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात पाणी सोडले जाईल, त्यामुळे पूरप्रवण क्षेत्रातील भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवार २५ सप्टेंबर रोजी धुळे, नंदुरबार, कोल्हापुर जालना, अकोला, परभणी, गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
तर नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, वाशिम, पालघर, मुंबई या जिल्ह्यात वादळवाऱ्यासह मेघगर्जना होणार असून जोरदार पावसाची शक्यता आहे. २६ सप्टेंबर रोजी नाशिक आणि ठाणे जिल्ह्यात मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे,
त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जळगाव, सांगली, लातूर, ठाणे, मुंबई, धाराशिव, जालना, चंद्रपूर, यवतमाळ येथे जोरदार पावसाचा अंदाज आहे.
सोलापूर : सायंकाळी-रात्री धो-धो
सोलापूर शहराला परतीच्या पावसाने झोडपून काढले. सोमवारी सायंकाळी आणि रात्री मुसळधार पाऊस कोसळला. दोन दिवसांत ३.३ इंच पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात मोहोळ, बार्शी, माळशिरस, मंगळवेढा येथेही पाऊस झाला. दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवसही पावसाचा अंदाज वर्तवला आहे
13 ऑक्टो. पर्यंत मान्सूनची माघार •
मान्सूनची दिशा बदलली असल्याने राज्यात होणारा पाऊस हा परतीचा आहे. तसेच महाराष्ट्रातून ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान मान्सूनची माघार पूर्ण होऊ शकते. मात्र हा कालावधी निश्चित नसतो. त्यामुळे २७ सप्टेंबरनंतरही पावसाची शक्यता कायम आहे. माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज