टीम मंगळवेढा टाईम्स ।
नाशिक कारागृहात हवालदार पदावर काम केलेल्या कल्याण दगडू गावसाने यांनी सोलापुरातील राहत्या घरी सायंकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
असाध्य आजारानंतर उस्मानाबाद येथून गावसाने यांची नाशिकला बदली झाली होती. उपचारासाठी पैसे कमी पडत असल्याने त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली.
मात्र वारंवार हेलपाटे मारून सुद्धा त्यांची शासकीय देय रक्कम त्यांना मिळाली नव्हती. नाशिक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेऊन काम करत असल्याने ते त्रस्त होते. त्
यामुळे त्यांनी आत्महत्या केली. अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला होता. परंतु पोलीस प्रशासनाकडून लेखी उत्तर दिल्याशिवाय आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने शासकीय रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.
पोलीस प्रशासनाकडून नातेवाईकांना वारंवार प्रेत ताब्यात घेण्यासंदर्भात विनवणी केली जात होती.
पत्राची वेळीच दखल घेतली असती तर …
मयत हवालदार कल्याण गावसाने यांनी कारागृह उपमहानिरीक्षक मध्य विभाग औरंगाबाद यांच्याकडे ६ जून रोजी लेखी पत्र पाठवून स्वेच्छानिवृत्तीचे पैसे द्यावे , किंवा कामावर हजर करून घ्यावे . अशा आशयाचे पत्र दिले होते.
मला माझ्या आजारपणासाठी पैशाची नितांत गरज आहे तरी, आपण लक्ष घालून तात्काळपेन्शन फंड ग्रॅच्युईटी मिळवून द्यावी, असे लेखी पत्र दिले होते. तसेच सर्व्हिस पुस्तक पडताळणी करीता २ हजार रुपये फोन पे द्वारे संबंधित व्यक्तीला पाठवले होते.
महिन्याच्या आत मला पेन्शनचे पैसे मिळाले नाही तर , मी आत्महत्या करेन . असे स्पष्ट पत्र लिहून त्यावर त्या कार्यालयाची स्थळ प्रत घेतली होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज