मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
बारावीचा निकाल आज लागणार आहे. दुपारी दोन वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे. राज्यात 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती. सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
कुठे पाहता येईल निकाल?
बारावीचे विद्यार्थी https://www.mahahsscboard.in mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, mahresults.org.in या संकेतस्थळावर आपले निकाल पाहू शकतात.
यासाठी विद्यार्थ्यांना बारावीचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर हॉल तिकीट क्रमांक आणि इतर डिटेल्स भरल्यानंतर तुमचा निकाल तु्म्हाला कळेल. विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड देखील करु शकतात.
SMS निकाल कसा पाहाल?
विद्यार्थ्यांना SMS द्वारेही आपला निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.
पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी मार्च महिन्यात दहावी बारावीची परीक्षा झाली होती. कोरोनानंतरची ही पहिलीची परीक्षा होती म्हणून यावेळी कॉपीमुक्त नांदेड पॅटर्न राबवण्यात आला होता.
त्यामुळे कापी हा प्रकार कमी झाल्याचे पाहायला मिळाले. परीक्षा संपल्यानंतर शिक्षकांनीही योग्य वेळेत उत्तर पत्रिकांची तपासणी केली. यामुळे आता आज रोजी निकाल जाहीर होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज