टीम मंगळवेढा टाईम्स।
शरद पवार म्हटले की एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर येते. त्यांच्या सहवासात अर्धा तास जरी घालवला तरी खूप काही शिकायला मिळते. काव्य, संगीत, नाटक आणि देशाचे माणुसकी जाणणारे राजकारण या सर्वांची सांगड त्यांच्यात आहे.
देशाला अशा नेतृत्वाची आज खरी गरज आहे. शरदचंद्र पवार म्हणजेच लोकशाहीची मूल्ये जपणारा सुसंस्कृत नेता असल्याचे प्रतिपादन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांनी केले.
शरदचंद्र पवार यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त उत्कृष्ट विद्यार्थी, कर्तृत्ववान महिला व जेष्ठ नागरिक यांच्या सन्मान सोहळ्यात प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी नगराध्यक्षा अरुणा माळी, धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजीराव काळुंगे, कार्याध्यक्ष संतोष रणधवे, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील,
उबठा गटाचे शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, रविराज मोहिते, बोराळ गावचे बाबासाहेब पाटील, भाळवणी गावचे सीताराम भगरे, माजी नगरसेविका सबजपरी मकांनदार, बबन ढावरे, आदीजन उपस्थित होते.
अनिल सावंत पुढे बोलताना म्हणाले की, भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून सामाजिक कार्यात गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत, विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिलांचा सन्मान करताना आज आम्हाला खूप आनंद होत आहे.
येत्या काही दिवसात विकासाच्या दृष्टीने नवनवीन प्रकल्प चालू करण्याचा मानस असल्याचे अनिल सावंत यांनी सांगितले.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे बोलताना म्हणाले की, येणाऱ्या काळात अनिल सावंत हे या मतदारसंघातील आमदार असतील, मुलांना मार्गदर्शन करताना ढोबळे म्हणाले की, शरद पवार साहेबांनी सर्वसामान्य जनतेच्या मुलांच्या शिक्षणासाठी राज्यात ठीक ठिकाणी शाळा सुरू केल्या असल्याचे ढोबळे यांनी सांगितले.
यावेळी खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी नगरसेवक चंद्रशेखर कोंडूभैरी यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज