मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतच्या हालचालींना आता वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण काल शुक्रवारी दुपारी जाहीर झाले. अधिसूचनेत सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाचा प्रवर्ग नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) असा जाहीर झाला आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसांतच जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. यासाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अध्यक्षपदाच्या आरक्षणाची मोठी चर्चा सुरू होती.
दरम्यान शक्रवारी सोलापूर जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत आतापर्यंत २० अध्यक्षांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे.
यात वैशाली सातपते. समन नेहतराव. डॉनिशिगंधा माळी, जयमाला गायकवाड या महिलांनीही अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. मागील साडेतीन वर्षापासून जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.
पं.स. सभापतीपदासाठी प्रवर्गनिहाय संख्या
सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, अनुसूचित जातीसाठी १, अनुसूचित जाती महिला १, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) २, सर्वसाधारण ३ व सर्वसाधारण (महिला) ३ अशा एकूण ११ पंचायत समितीच्या सभापतीपदाची संख्या जाहीर करण्यात आली आहे.(स्रोत:लोकमत)
आतापर्यंत झालेले ओबीसी अध्यक्ष
बाबुराव मारुती जाधव – २१ मार्च १९९७ ते २० मार्च १९९८
नारायण शिवराम खंडागळे -२१ मार्च १९९९ – २० मार्च २००२
वैशाली लक्ष्मण सातपुते – १८ फेब्रुवारी २००५ – २० मार्च २००७
– डॉ. निशिगंधा प्रशांत माळी-कोल्हे २१ मार्च २०१२ – २० सप्टेंबर २०१४
मंगळवेढा तालुक्यात दामाजी नगर, हुलजंती, भोसे, लक्ष्मी दहिवडी चार जिल्हा परिषदेचे गट असून यापूर्वी तालुक्यातून दोन सर्वसाधारण पुरुष, एक ओबीसी महिला आणि एक राखीव महिला हे चार सदस्य कार्यरत होते.
नव्या आरक्षण सोडतीत चार गटाचे आरक्षण काय होणार? हे अध्याप निश्चित नसले तरी सर्वसाधारण जागेवर देखील तालुक्यामध्ये नागरिकाचा मागास प्रवर्गाचा उमेदवार विजयी झाल्यास जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या शर्यतीत येऊ शकतो. अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज