टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढ्यात भाजपा ओबीसी युवा मोर्चा व देशसेवा कामगार युनियन यांच्या सयुंक्त विद्यामाने महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांची माहिती बांधकाम कामगारांना मिळावी या हेतूने हा मेळावा आयोजित केला आहे.
बांधकाम कामगारांची नोंदणी मेळावा व मार्गदर्शन दि.२२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता जगदंबा मंदिर, शनिवार पेठ, मंगळवेढा येथे घेण्यात येणार आहे.
पाणीदार आमदार समाधान दादा अवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील २४ गावाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल व रस्त्यासाठी भरघोस निधी आणल्याबद्दल
आमदार समाधान आवताडे व उपेक्षित,वंचित,दुर्लक्षित व भटक्या विमुक्त बहुजनांचा आवाज बनून “लोकनेते बहुजन योद्धा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ‘पावसाळी अधिवेशनामध्ये’ “जातीच्या दाखल्यासाठी
१९६१ सालाची पुरावा दाखल्याची” जाचक अट रद्द करण्याची मागणी केल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांचा जाहिर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी विशाल घोडके सहाय्यक आयुक्त बांधकाम कामगार कल्याण, सोलापूर करणार आहेत.
शशिकांत चव्हाण, आदित्य हिंदुस्तानी व शशिकला मुदगुल यांच्या नेतृत्वाखाली मेळावा घेण्यात येत आहे.
बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना बांधकाम कामगार मंडळाकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत.
यामध्ये मुलांचे शिक्षण, विवाहासाठी खर्च, महिलांना बाळंतपणाचा खर्च याचा समावेश यामध्ये होतो. सध्या शासनाकडून ही योजना ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबरची जोडणी करून घेणे आवश्यक आहे.
मंगळवेढातील सर्व बांधकाम कामगारांनी उपस्थित राहून सर्व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आदित्य हिंदुस्तानी यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज