टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडीत रिक्त पदावर अंगणवाडीताई व मदतनीस यांची भरती होणार आहे. त्यापूर्वी रिक्त पदावर मदतनीस यांना पदोन्नती देण्यात येणार आहे.
शासनाच्या आदेशानुसार सरळ सेवा नियुक्तीने भरती होणार
त्यानंतर राहिलेल्या ठिकाणी राज्य शासनाच्या आदेशानुसार सरळ सेवा नियुक्तीने भरती होणार आहे.
७१८ रिक्त पदाच्या भरतीची तयारी सुरू
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या ७१८ रिक्त पदाच्या भरतीची तयारी जिल्हा परिषदेकडून सुरू झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात ३ हजार २६३ मोठ्या तर ९४५ मिनी अंगणवाडी आहेत. जिल्ह्यात १३१ पर्यवेक्षिकांचे पदे मंजूर आहेत. यापैकी ९४ पदे कार्यरत असून, ३७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
जिल्ह्यातील ३ हजार २६३ अंगणवाडीत ३ हजार ३८ सेविका कार्यरत असून, २२५ पदे रिक्त आहेत. मिनी अंगणवाडीमध्ये १ हजार २६ सेविका कार्यरत असून, ७७ पदे रिक्त आहेत.
जिल्ह्यात मदतनिसांचे ३ हजार १४७ पदे मंजूर असून, यापैकी २ हजार ७१५ पदे कार्यरत आहेत. रिक्त असलेल्या ४३२ ठिकाणी पदांची भरती करण्यात येणार आहे.
बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक
अंगणवाडी सेविकासाठी यापूर्वी सातवी पास उत्तीर्णची अट होती. आता या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराचे वय किमान १८ तर कमाल ३५ वर्षे असणे आवश्यक आहे.(स्रोत:लोकमत)
मार्च महिन्यात रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु होईल
राज्य शासनाच्या सूचनेनुसार रिक्त पदांच्या भरतीसाठी पहिल्या टप्प्यात पदोन्नतीची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.
मार्च महिन्यात सरळ सेवा भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. पदोन्नती प्रक्रिया फेब्रुवारीअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यात रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु होईल. -जावेद शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज