टीम मंगळवेढा टाईम्स।
वॉटर प्युरिफायर मटेरियलची परस्पर विक्री करून कंपनीची 48 लाख 63 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात मंगळवेढा तालुक्यातील युवक म्हणजे कंपनीच्या सेल्समनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत प्युअर वन वॉटर इंडस्ट्रीज इंडिया प्रा.लि.च्या वाघोली येथील सत्यम पार्कमधील आउटलेटमध्ये घडला आहे.
याबाबत हितेश घनश्याम कुमावर (वय 32, रा. रावेत, पुणे) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.2) फिर्याद दिली आहे.
यानुसार पोलिसांनी सतीश हरिराम येरवी (वय 35, रा. लवंगी, मंगळवेढा, सोलापूर) याच्यावर आयपीसी 408 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सतीश येरवी हा फिर्यादी यांच्या कंपनीत एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत सेल्स पर्सन म्हणून कामाला होता.
आरोपीने फिर्यादी यांच्या कंपनीचे वॉटर प्युरिफायर मटेरियलची परस्पर विक्री केली. त्याने ग्राहकांकडून मिळणारी रक्कम कंपनीच्या खात्यात जमा करून न घेता फोन पे व गुगल पेच्या माध्यमातून स्वत:च्या बँक खात्यात जमा करून घेतली.
आरोपी सतीश येरवी याने कंपनीची 48 लाख 63 हजार 888 रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज