मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी हा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
या रिक्त जागांवर कुणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीनंतर विधान परिषदे संख्याबळ देखील बदलणार आहे.
राज्यात नुकताच विधानसभा निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर परिषदेच्या 5 जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत.
परिषदेतील एकूण 5 आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत. यामुळे विधान परिषदेत 5 जागा रिक्त आहेत. आमशा पाडवी, राजेश विटेकर, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड या सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत.
या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानपरिषदेच्या या 5 रिक्त जागांवर कुणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी 10 मार्च ते 17 मार्च दरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. 18 मार्च रोजी अर्जाची छाननी होणार आहे. 20 मार्चला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 27 मार्च रोजी विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
विधान परिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ
विधान परिषदे एकूण 78 सदस्य असतात. सध्या महायुतीचे एकूण 32 सदस्य आहेत. यापैकी भाजपचे 19 सदस्य, शिवसेनेचे 6 सदस्य तर, राष्ट्रवादीचे 7 सदस्य आहेत. महाविकास आघाडीचे एकूण 17 सदस्य आहेत.
शरद पवार पक्षाचे 3, काँग्रेसचे 7 तर उद्धव ठाकरे पक्षाचे 7 तर 3 अपक्ष सदस्य आहेत. विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या 78 असली तरी विद्यमान सदस्य संख्या 52 आहे. तर 26 सदस्यांची संख्या रिक्त आहे.
अशी असते महाराष्ट्र विधान परिषद
केंद्रात ज्याप्रकारे राज्यसभा हे वरीष्ठ सभागृह असते त्याप्रकारे राज्य पातळीवर विधान परिषद हे वरीष्ठ सभागृह म्हणून काम करतं. विधानपरिषद ही विधानसभेप्रमाणे पाच वर्षांनी विसर्जित होत नाही. तर सभागृहातील एकूण सदस्यसंख्येपैकी एक-तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात.
महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण 78 सदस्यांपैकी 30 सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात. 22 सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात. 7 सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून तर 7 सदस्य शिक्षक मतदारसंघांमधून निवडले जातात.
विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषद निवडणुकीसाठी जनतेतून मतदान होत नाही. थेट निवडणूक प्रकिया नाही. पसंतीक्रमानुसार सदस्य निवड होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज