मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
कोल्हापूर येथील विशेष पोलिस महानिरिक्षक कार्यालयासमोर मंगळवेढयाचे पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या निलंबनाच्या कारवाई मागणीसाठी गेली दोन दिवस विविध पक्षांचे सुरु असलेले बेमुदत धरणे आंदोलन
विशेष पोलिस महानिरिक्षक सुनिल फुलारी यांनी दहा दिवसात संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून चौकशीचा अहवाल तात्काळ या कार्यालयास सादर करावा
असे लेखी पत्र सोलापूरचे पोलिस अधिक्षक यांना दिल्याने हे आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आल्याची माहिती आंदोलन प्रमुख नारायण गोवे यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली आहे.
मंगळवेढयात पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे वाढणारे अवैध धंदे, पडोळकवाडी येथील वृध्देचा दरोडेखोरांनी केलेल्या खुनातील मारेकर्यांना अदयापपर्यंत पकडण्यात आलेले अपयश,
परराज्यातील अल्पवयीन बालकास पळवून नेल्या घटनेचा शोध घेण्यात अपयशी ठरलेली पोलिस यंत्रणा,पोलिस स्टेशन आवारातून कारवाई न करता वाळूचे सोडलेले टिपर,
अवैध धंदेवाल्यांकडून दोन पोलिसामार्फत होणारी हप्तेवसुली या व अन्य विविध मागण्यांसाठी मंगळवेढयातील विविध राजकिय पक्षाचे लोक विशेष पोलिस महानिरिक्षक यांच्या कार्यालयासमोर दि.1 जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन करीत होते.
या आंदोलनाची दखल घेवून विशेष पोलिस महानिरिक्षक सुनिल फुलारी यांनी सोलापूरचे पोलिस अधिक्षक यांना लेखी पत्र काढून मंगळवेढा तालुक्यातील गंभीर स्वरूपाच्या गुन्हयाचा तपास लावण्यात अपयशी ठरल्याने व अन्य तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करून अहवाल सादर करावा,
अदयापर्यंत कुठलाही अहवाल या कार्यालयास प्राप्त झाला नाही. सदर तक्रारी अर्जातील मुद्दयांच्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी सखोल चौकशी करावी व केल्या चौकशीचा मसुदा अहवाल दहा दिवसात
या कार्यालयास पुढील कारवाईस्तव सादर करावा असे दिलेल्या लेखी पत्रात नमूद करण्यात येवून हे पत्र तक्रारदार नारायण गोवे यांना सर्व पक्षीयांच्या वतीने देण्यात आल्याने त्यांनी सदर धरणे बेमुदत आंदोलन तुर्त स्थगित केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज