टीम मंगळवेढा टाईम्स।
दामाजी नगर गटात इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दामाजी नगर गटात धर्मगावचे माजी सरपंच रामचंद्र सलगर शेठ यांनी निवडणूक लढवावी असा जनमनातून सुर वाढत आहे.
सलगर शेठ यांचा तालुक्यातील ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहे गरीबी जवळून पाहिली असल्यामुळे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे दुःख चांगल्या प्रकारे जाणणारा माणूस म्हणून पंचक्रोशीत ओळख आहे.
कोणताही जातीभेद न करता सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन समाजकारण करणे,गोरगरीब उपेक्षितांना मदतीला धावून जाणारे, सामाजिक कार्यक्रमांना मदत करणारे एक दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.
दामाजीनगर गट हा ओबीसी साठी राखीव झाल्यापासून त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह आहे. सलगर शेठ यांनी ही निवडणूक लढवून दामाजी नगर गटाचे नेतृत्व करावे अशी चर्चा तालुक्यात जोर धरत आहे.
रामचंद्र शेठ सलगर यांचे कायमच मोठे योगदान राहिले
धर्मगावच्या विकास कामासाठी रामचंद्र शेठ सलगर यांचे कायमच मोठे योगदान राहिले आहे. रामचंद्र सलगर यांच्या विशेष प्रयत्नातून गावाच्या विकास कामासाठी लाखो रुपयेचा निधी मिळाला आहे.
रामचंद्र सलगर शेठ वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम घेत असतात त्यांनी ही निवडणूक लढवावी कारण सर्व जाती धर्मांना घेऊन जाणाऱ्या उमेदवाराची या मतदार संघाला गरज आहे. – मंगल भिमराव सलगर,सरपंच ग्रामपंचायत धर्मगाव
मुलीच्या नावे 10,000 च्या ठेवी ठेवल्या
सलगर शेठ कायमच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून 1 जून रोजी जन्माला आलेल्या मुलीच्या नावे 10,000 च्या ठेवी ठेवल्या आहेत.
तरुणाईवर त्याचा चांगलाच प्रभाव आहे सार्वजनीक कार्यक्रमासाठी ते आवर्जून सहकार्य करत असतात या वेळेसचा मतदारांचा उत्साह पाहता त्यांनी ही निवडणूक लढवावी. -विष्णु पावले, सामाजीक कार्यकर्ते बोराळे ता.मंगळवेढा
गोरगरिब,शेतकरी, कामगार आणि कष्टकार्याच नेतृत्व
धर्मगावाला आत्ता पर्यंत तालुका पातळीवर नेतृत्व करायची संधी नव्हती दामाजी नगर गटामध्ये जिल्हा परिषदसाठी ओबीसी आरक्षण पडले आणि सलगर शेठ याच्या रूपाने ती संधी आहे. रामभाऊ शेठ हे गोरगरिब,शेतकरी, कामगार आणि कष्टकार्याच नेतृत्व आहे गरिबी जाळून पाहिलेले नेता आहे,
त्याच्या सामाजिक संस्थेमार्फत आरोग्य शिबिरे,वृक्षारोपण,शालेय साहित्याचे वाटप असे सामाजीक उपक्रम वेळोवेळी घेत असतात. त्यांनी गावामध्ये स्मशानभूमी बांधकाम, बुद्ध विहार बांधकाम, तसे छोटे-मोठे समाज उपयोगी कामे स्वखर्चातून केली आहेत.- प्रविण टकले, सामाजीक कार्यकर्ते धर्मगाव ता.मंगळवेढा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज