टीम मंगळवेढा टाईम्स।
संत दामाजीनगर जिल्हा परिषद गटातून रामचंद्र सलगर हे प्रबळ दावेदार असून त्यांना बोराळे व दामाजीनगर पंचायत समिती गणातूनही स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
सलगर शेठ यांचा तालुक्यातील ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहे. सामाजिक कामाच्या जोरावर व गावकऱ्यांच्या सहकार्य मुळे गावपातळीवर पत्नी सरपंच म्हणुन व उपसरपंच म्हणुन स्वत काम पाहिले आहे.

चालू पंचवार्षिकला भावजयी सरपंच व भाऊ ग्रामपंचायत सदस्य म्हणून योग्य रित्या विकास कामे मार्गी लावत आहेत.

कोणताही जातीभेद न करता सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन समाजकारण करणे, गोरगरीब उपेक्षितांना मदतीला धावून जाणारे, सामाजिक कार्यक्रमांना मदत करणारे एक दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.

दामाजीनगर गट हा ओबीसी साठी राखीव झाल्यापासून त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह आहे. सलगर शेठ यांनी ही निवडणूक लढवून दामाजी नगर गटाचे नेतृत्व करावे अशी चर्चा तालुक्यात जोर धरत आहे.

त्यातच त्यांनी निवडणूक जाहीर होण्याआधीच जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये जाऊन स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

बोराळे, अरळी, सिद्धापूर, तांडूर, राहटेवाडी, ब्रह्मपुरी, माचणूर आदी गावांना त्यांनी भेट देऊन आजपर्यंत कोणी काय काय कशी कामे केली आहेत याची पाहणी केली आहे.

आपण निवडून आल्यानंतर दामाजीनगर गटातील सर्व गावांना भरपूर निधी आणून विकास काय असतो तो दाखवणार असल्याचे रामचंद्र सलगर शेठ यांनी स्पष्ट केले आहे.
सलगर शेठ यांना जनतेचा चांगला प्रतिसाद
बोराळे व दामाजीनगर गणातून रामचंद्र सलगर शेठ यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गाव भेटी दरम्यान एक नवीन चेहरा म्हणून सलगर शेठ यांच्या नावाला लोक पसंती देत आहेत.
सलगर शेठ यांना पक्षाने उमेदवारी दिली तर पूर्ण ताकदीने सलगर शेठ यांच्या पाठीशी राहू- मा.रमेश भांजे, अरळी (दामाजी शुगर माजी संचालक)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











