टीम मंगळवेढा टाईम्स ।
रतनचंद शहा सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन रामचंद्र एकनाथ जगताप यांचा 75 वा अमृत महोत्सव आज आप्पाश्री लॉन्स येथे सायंकाळी 5.30 वाजता होणार असल्याची माहिती पक्षनेते अजित जगताप यांनी दिली आहे.
अमृत महोत्सवा निमित्ताने आज सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
रामचंद्र जगताप यांची ग्रंथतुला करून ती पुस्तके जेष्ठ नागरिक व स्पर्धा परीक्षा अभ्यासकेंद्रास जगताप परिवार भेट देणार आहेत.
तसेच मंगळवेढा शहरातील नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप देखील करण्यात येणार आहे.
आज होणाऱ्या अमृत महोत्सव कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम फौंडेशनचे संचालिका सौ.सुप्रिया जगताप यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज