टीम मंगळवेढा टाईम्स ।
७७ वर्षाच्या जन्मदात्या वृद्ध आईचे पालन पोषण न करता उलट तिच्या मालकीच्या घरजागेची परस्पर विल्हेवाट लावली आणि तिला शासनाकडून मिळणारी संजय गांधी निराधार योजनेच्या मासिक अनुदानाची रक्कमही हडप करणाऱ्या दोन्ही बेजबाबदार मुलांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात रामबाई सिद्राम मंजुळे (रा. तक्षशीलनगर, कुमठा नाका, सोलापूर) या दुर्दैवी वृद्ध महिलेने सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिची मुले भोजप्पा आणि नामदेव यांच्या विरुद्ध ज्येष्ठ नागरिक, पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम २००७ अनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
भोजप्पा व नामदेव ही दोन्ही मुले सांभाळ करीत नसल्यामुळे रामबाई निराधार होऊ न हताश झाल्या आहेत. गेली तीन वर्षे रामबाईंची अशी दुर्दशा चालली आहे.
सोलापूर शहराजवळील होटगी येथील आई रामबाई हिच्या मालकीची घरजागा दोन्ही मुलांनी परस्पर हडप करून विकून टाकली.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत रामबाईला दरमहा मिळणारे आर्थिक अनुदानही थोरला मुलगा भोजप्पा घेऊ न जातो.
आईला वृद्धापकाळात आधार देण्याऐवजी तिला घराबाहेर काढून तिचा छळ चालविणाऱ्या दोन्ही बेजबाबदार मुलांविरुद्ध शेवटी वृद्ध आईला पोलिसांत धाव घ्यावी लागली.(स्रोत:लोकसत्ता)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज