मंगळवेढा टाईम्स न्यूज ।
मंगळवेढा तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांची अक्षरशः माती झाली आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांना आता जागेवरच अंकुर फुटून घटस्थापना झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
उरलीसुरली आशा देखील सततच्या पावसामुळे संपली आहे. पण यावेळी पाऊस त्याचं आक्राळविक्राळ रुप सोबत घेऊन आला आहे.
त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांना या पावसाचा फटका बसताना दिसतोय. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान होताना दिसतंय.
नद्यांना पूर आलेला बघायला मिळतोय. उभ्या पिकांमध्ये पाणी असल्यामुळे पिके आता दिसेनाशी झाली आहेत, मंगळवेढ्याकडे येणाऱ्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
तालुक्यातील ‘या‘ गावांचा संपर्क तुटला
1) मंगळवेढा-बोराळे, 2 ) बोराळे-राहटेवाडी, 3) सिद्धापुर-तामदर्डी, 4 ) डोणज-भालेवाडी, 5) वाडापुर बंदारा पाण्याखाली, 6) अरली बंदारा पाण्याखाली, 7) अरली सिद्धापूर थोडया वेळात बंद होईल अशी परिस्थिती तालुक्यातील निर्माण झाली आहे.
मंगळवेढा तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे. त्यामुळे या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तसेच मुसळधार पावसामुळे बोराळे, डोणज, राहटेवाडी आदी मार्गावरील पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे.
पुलावरुन पुराचं पाणी वाहून जात असताना देखील वाहनचालक जीव धोक्यात टाकून जाताना दिसत आहेत. वाहनचालकांच्या या धाडसामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं धाडस करु नका, असं आवाहन केलं जात आहे.
त्वरित नुकसान भरपाई द्यावी
मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे भरून न येणारे प्रचंड नुकसान झाले असून या संदर्भात प्रशासनाने पंचनामे करून शेतकरी बांधवांना त्वरित मदत द्यावी – श्रीमंत केदार, शेतकरी, डोणज
सर्वांत जास्त मंगळवेढा तालुक्यासह आदी ठिकाणी
सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत कमी-जास्त प्रमाणात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वांत जास्त मंगळवेढा तालुक्यासह आदी ठिकाणी झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे अजून पंचनामे पूर्ण झाले नाहीत; मात्र सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज