मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात दहा सभा होणार आहेत. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूरचाही समावेश असल्याची माहिती, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. यासंदर्भात दिव्य मराठीने आज वृत्त प्रसिद्ध केले आहे.
सुशीलकुमार शिंदे यांनीही त्याला दुजोरा दिला. येत्या लोकसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला सध्या अनुकूल वातावरण असल्याचा दावा काँग्रेस नेते करीत आहेत.
राज्यातील अस्थिर परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसने लोकांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच राज्यभर सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर बसयात्रा काढण्यात येणार आहे.
काँग्रेस नेत्यांची नुकतीच दिल्लीत बैठक पार पडली. त्यात आगामी काळातील दौऱ्यासंदर्भात चर्चा झाली. सोलापूर आणि माढा हे लोकसभेचे दोन मतदार संघ सोलापूर जिल्ह्यात येतात. त्यामुळेच सोलापूर आणि पंढरपूर अशा दोन ठिकाणी सभा घेण्याचा निर्णय झाला आहे.
प्रणिती शिंदे यांच्यावर लवकरच सोपवणार विशेष जबाबदारी?
आमदार प्रणिती शिंदे या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत राज्याबाहेरही सहभागी होत्या. प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष म्हणून त्या सक्रिय आहेत. दिल्लीतील बैठकीतही त्या सहभागी होत्या. लोकसभेसाठी सोलापूरच्या उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. लवकरच त्यांच्यावर विशेष जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. यांचे नाव पुढे आहे.
काँग्रेस रविवारी निवडणार विधानसभा विरोधी पक्षनेता
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे येणार आहे. येत्या रविवारी विरोधी पक्षनेत्याबाबत निर्णय होणार आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी नाना पटोले, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांची नावे चर्चेत आहेत. विधान परिषदेत कोल्हापूरचे सतेज पाटील
पावसाचा अंदाज घेऊन सभेच्या तारखा करणार निश्चित
सोलापूर, पंढरपूरसह राज्यभरात विभागनिहाय दहा ठिकाणी सभा निश्चित केल्या जात आहेत. पावसाचा अंदाज घेऊन तारखा निश्चित केल्या जातील. सध्या अधिवेशनाची तयारी सुरू आहे. रविवारी विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाबाबत निर्णय घेणार आहोत. नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज