मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
मंगळवेढा तालुक्यातील राजकीय समीकरणे नव्या घडा मोडींकडे वळत असताना आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुका समविचारी आघाडी सक्रिय झाली असून आज बैठक संपन्न झाली आहे.

या बैठकीमध्ये भगीरथ भालके यांना निमंत्रण का दिले नाही यावरून रामचंद्र वाकडे व बबनराव अवताडे यांनी जाब विचारून भर बैठकीतून माघारी फिरले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरू असतानाच हा प्रकार घडला.

तर दामाजी कारखान्याचे दिगवंत संचालक पी बी पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाला प्रथमेश पाटील यांना स्वीकृत संचालक म्हणून घेण्यासाठी गेले तीन वर्षे झाले टोलवाटोलवी होत असल्याच्या कारणामुळे भर बैठकीत पाटील समर्थकांनी राडा घातला.

दरम्यान, येत्या तीन दिवसात या प्रकरणावरती योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिले आहे.

दामाजी साखर कारखान्या निवडणुकीनंतर आता समविचार आघाडी सक्रिय झाली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पूर्ण ताकदीने एकसंघ होऊन निवडणूक लढवणार असल्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी जाहीर केले आहे.


बैठकीत शहर व ग्रामीण भागातील समविचारी आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












