वाळत घातलेले गहू जनावराने खाल्ल्याप्रकरणी जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी यशवंत भाऊ कोकरे , भिवा भाऊ कोकरे या दोघाविरूध्द अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी दि. )२२ रोजी यातील फिर्यादी इंदूबाई भगवान वाघमारे हिने देगाव येथे दुपारी २.०० वा . घरासमोर रेशनचे गहूवाळत घातले होते.
आरोपी यशवंत कोकरे यांची जनावरे येवून गहू खावू लागले.यावेळी फिर्यादी हिने तुझी रेडी गहू खात आहे. तीला नेवून काप जा , असे म्हणाल्याने संतापून फिर्यादीस शिवीगाळ करून हाताने चापट मारली.
व तुला गावात राहू देत नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील हे करीत आहेत.
बेकायदा वाळू वाहतूक पोलिसांनी टेंपो पकडला
मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव येथील माण नदीपात्रातून बेकायदा वाळू घेवून जाणारा टेंपो पोलिसांनी पकडून जप्त केला आहे.
याप्रकरणी युवराज बोडरे व सर्जेराव धोतरे ( रा.शनिवार पेठ ) या दोघाविरूध्द वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , दि . ४ रोजी यातील आरोपी युवराज बोडरे व सर्जेराव धोतरे यांनी त्यांच्या ताब्यातील टेंपो एम एच १३ ,जी .२४८५ मध्ये गुंजेगाव येथील माण नदीपात्रातून पाच हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू चोरून भरून विना परवाना त्याची वाहतूक करीत असताना मिळून आले.
याची फिर्याद पोलिस शिपाई पैगंबर नदाफ यानी दिली आहे.अधिक तपास पोलिस नाईक कोळी हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज