सुरज फुगारे । 9561617373
येत्या दि १ डिसेंम्बर रोजी होऊ घातलेली पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही पदवीधर बेरोजगार युवकांच्या मुद्यावर लढणार असून कोणतेही भावनिक प्रश्न न घेता पदवीधर युवकांचे प्रश्न घेऊन काम करणार असे प्रतिपादन डॉ.निलकंठ खंदारे यांनी केले.
पुणे पदवीधर मतदारसंघांमध्ये यापूर्वी पदवीधरांच्या संदर्भाने कोणतीही दीर्घकालीन नियोजनात्मक काम पदवीधर आमदारांकडून केले गेले नसून त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये पदवीधर युवकांची बेरोजगारी वाढलेली दिसते.

घरोघरी इंजिनीयर डॉक्टर नेट/ सेट, पीएच.डी, फार्मासिस्ट, कृषी पदवीधर, वकील इत्यादी उच्चशिक्षित युवक बेरोजगार फिरताना दिसतात त्यांच्या संदर्भामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाकडे योजना नाही राजकीय पक्ष फक्त स्वतःच्या नावाचा उपयोग करून पदवीधरांच्या प्रश्नांना बदल देताना दिसतात मात्र माझ्याकडे निश्चित मास्टर प्लॅन आहे त्यामुळे येणारी निवडणूक आपण पदवीधर युवकांसाठी काम करून जिंकू असा आशावाद प्राध्यापक डॉ. निलकंठ खंदारे यांनी व्यक्त केला आहे.
डॉ.खंदारे यांनी अनेक सामाजिक शैक्षणिक चळवळीमध्ये भाग घेतला असून युवकांच्या प्रश्नावर ते अत्यंत संवेदनशील आहेत. सरकारी निमसरकारी तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरती व्हावी यासाठी आपण पदवीधरांचा आवाज विधान परिषदेच्या माध्यमातून पोहोचवून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे.
आज गावोगावी चे विद्यार्थी शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जाताना दिसतात मात्र सर्वच विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याने केवळ डिग्री घेऊन घरातच राहतात प्रत्येक त्यांना अभ्यासाची व मार्गदर्शनाची सोय व्हावी म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय यूपीएससीचे एक प्रशिक्षण केंद्र निर्माण करावे आणि तालुक्याच्या ठिकाणी एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र आणि राहण्याची सोय करण्यासाठी खास वसतिगृह बांधण्यात यावीत यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. निलकंठ खंदारे हे शिवाजी विद्यापीठात सिनेट सदस्य असून ते वनस्पतीशास्त्र विषयात संशोधक मार्गदर्शक आहेत.त्यामुळे बेरोजगार विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही भावनिक मुद्याला बळी न पडता पदवीधर बंधू-भगिनी आपण काम करीत असणाऱ्या मुद्द्यांवर ती भरभरून मतदान करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
निलकंठ खंदारे यांना वीस पेक्षा जास्त संघटनांचा जास्त संघटनांचा पाठिंबा असून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार तयारी केली आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











