टीम मंगळवेढा टाईम्स ।
सार्वजनिक गणेशोत्सव दि.7 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. ते पुरस्कार देण्यासाठी निवड करण्याची पध्दत पुढील प्रमाणे.
या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल.
या स्पर्धेंसाठी पुढील निकषांच्या आधारे पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल.
गुणांकनांसाठी बाब –सांस्कृतीक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन (प्रत्येकी 2 गुण) गायन,वादन, नृत्य,नाट्य, लोककला, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कला, हस्तकला, चित्रकला, शिल्प कला, माहितीपट किंवा चित्रपट, यासाठी गुणांकण 20 असून
संस्कृती जतन किंव संवर्धन (प्रत्येकी 2 गुण) – संस्कृति संवर्धनासाठी अभिनव उपक्रम, पारंपारिक नाणी / शस्त्र/ भांडी/ इ. संग्रहाचे प्रदर्शन, साहित्य विषयक उपक्रम , लुत्प होणाऱ्या कलाविष्कारांचे संवर्धन -गुणांकन 10
राज्यातील गड किल्ले यांचे जतन व संवर्धन ( 5 गुण) , राष्ट्रीय /राज्य स्मारके , धार्मिक स्थळांविषयी जन जागरूकता जतन व संवर्धन (5 गुण). – गुणांकण 10
सामाजिक उपक्रम (प्रत्येकी 2 गुण) – महिला सक्षमीकरण , पर्यावरण रक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार व प्रचार , व्यसनमुक्ती /अंधश्रध्दा निर्मूलन / सामाजिक समोखा , जेष्ठ नागरिकांसाठी उपक्रम आरोग्यविषक उपक्रम , शैक्षणिक उपक्रम ,कृषी विषक उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाची जनजागृती, वंचित घटकांसाठी उपक्रम,
कायमस्वरूपी सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना 5 गुण देण्यात येतील. उदा.सार्वजनिक गणेशात्सव मंडळाकडून कायमस्वरूपी राबविण्यात येत अ सलेल्या आरोग्य सेवा, ग्रंथालय, वृध्दाश्रम, एखादेगाव दत्तक घेणे व इतर सामाजिक सेवा.
पर्यावरणपूरक मुर्ती गुणांकण 5 गुण, पर्यावरणपूरक सजावट (थर्माकोल व प्लास्टिक विरहित) गुणांकन 5 गुण ,पारंपारीक देशी खेळांच्या स्पर्धा – गुणांकन 10 गुण, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा (प्रत्येकी 2 गुण) – पिण्याच्या पाण्याची सोय,
प्रसाधनगृह , वैद्यकिय प्रथमोपचार , वाहतुकीस अडथळा येणार नाही असे आयोजन / आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता. गुणांकन 10 असे एकुण 100 गुणांची स्पर्धा असणार आहे.
स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांनी केलेल्या कार्याबाबतचा कालावधी हा सन 2023 च्या अनंत चतुदर्शी ते सन 2024 च्या अनंत चतुर्दशी पर्यंतचा असेल.
वरील बाबींची पुर्तता करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने करावयाच्या अर्जाचा नमुना पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग ,शासन निर्णय दि 31 जुलै 2024 च्या परिशिष्ट अ मध्ये जोडला आहे.
गणेशोत्सव स्पर्धेअंतर्गत भाग घेणाऱ्या मंडळांपैकी सलग दोन वर्ष राज्यस्तरीय / जिल्हास्तरिय पारितोषिक प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत. ही अट इतर मंडळांना संधी देण्याच्या उद्देशाने नमूद करण्यात आली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पु.ल.देशापांडे महराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.pld@gmail.com या इमेलवर दि. 01 ऑगस्ट 2024 ते 31 ऑगस्ट 2024 पुर्वी सादर करावेत, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज