टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव यंदा नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे.
महोत्सवाच्या आयोजनासाठी मंगळवेढ्यातील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयाने प्रस्ताव दिला आहे. अशी माहिती कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी दिली आहे.
कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयाकडून प्रस्ताव आल्यानंतर विद्यापीठाच्या समितीने महाविद्यालयाची पाहणी केली आहे.
पाहणीचा अहवाल कुलगुरू डॉ.फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. ३० जुलैला प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत होती.
मुदतीत ग्रामीण भागातील एकाच महाविद्यालयाकडून प्रस्ताव सादर झाल्याने याच महाविद्यालयास आयोजकत्त्व मिळणार अशी चर्चा सुरू आहे.
दोन वर्षानंतर युवा महोत्सव होणार
कोरोनामुळे पहिल्या वर्षी युवा महोत्सव झालेला नव्हता. तर दुसऱ्या वर्षी ऑनलाइन महोत्सव झाला. त्यामुळे दोन वर्षे विद्यार्थ्यांना महोत्सवाचा आनंद घेता आला नाही.
एकदिवसीय शिबिर
सप्टेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल. त्यानंतर विद्यार्थी महोत्सवाच्या तयारीला लागतात. दरम्यान , डफरीन चौकातील मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट मध्ये महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय शिबिर होणार असल्याची माहिती देखील डॉ.फडणवीस यांनी दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज