टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगरपरीषदेचा पाण्याचा टँकर गेल्या कित्येक महिन्यापासून ठेकेदारांनी टँकर वरचे नाव पुसून वापरण्यास नेला आहे. असा आरोप भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव यांनी केला आहे.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले , ज्यावेळी आम्ही नगरपरिषदेचा टँकर कुठे आहे असे विचारायला गेलो असता , उडवाउडवीची उत्तरे मिळाली,
तसेच आम्ही बघून सांगतो आम्हाला माहिती नाही, माहिती घ्यावी लागेल असे उत्तर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाले. तसेच आम्ही अधिकाऱ्यांना बोलत असताना ठेकेदाराचा फोन अधिकाऱ्यांना आला व त्याने टँकर भंगारला घातला असे सांगा , म्हंटले.
याचा अर्थ सरळ आहे की अधिकारी व ठेकेदार यांच्यात सांगणमत आहे. सामान्य नागरिकांच्या पैशातून नगरपरिषदेच्या घेतलेल्या मालमत्ता ठेकेदार राजरोस पणे स्वतःची मालकी गाजवत वापरत आहेत.
नगरपरिषदेचा पाण्याचा टँकर गेल्या कित्येक दिवसापासून नगरपरिषदेच्या कोणत्याही कामावर न वापरता ठेकेदार स्वतःच्या वैयक्तिक व दुसऱ्या कामावर वापरत असल्याचे दिसून येत आहे.
सदरील बाब मुख्याधिकारी, आरोग्य विभाग सर्वांना माहिती असून देखील टक्केवारी खाऊन गप्प बसले आहेत. नागरिकांची सोय बाजूला ठेवून नगरपरिषदेचे अधिकारी देखील ठेकेदारांना साथ देत आहेत असा खळबळजनक आरोप सुदर्शन यादव यांनी केला आहे.
मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ, माळी गल्ली व इतर तीन ठिकाणच्या सिमेंट टाक्या देखील नगरपरिषदेच्या ठेकेदारांनी काढून नेऊन स्वतःच्या वापराकरता नेल्या आहेत.
पण या टाक्या नगरपरिषदेच्या ताब्यात आहेत असे वर वर चे उत्तर मुख्याधिकारी देत आहेत.
मंगळवेढा नगरपरिषद नागरिकांना पाणीपट्टी घरपट्टी भरा म्हणून आवाहन करत आहे,
पण नागरिकांनी भरलेल्या कराच्या बदल्यात ठेकेदार स्वतःची घर भरून घेत आहेत. सदरील टँकर बाबत व स्टँड पोस्ट टाक्याबद्दल मुख्याधिकारी यांनी खुलासा करावा व आजपर्यंत ठेकेदारांनी टँकर वापरला त्याचे भाडे जनतेसमोर घ्यावे.
नगरपरीषदेचा टँकर मधील टक्केवारी कार्यक्रम आता उघडा झाला आहे. मुख्याधिकारी यांनी याबाबत खुलासा करावा.
तसेच युवा मोर्चा ने गोंधळ केल्यानंतर रात्री 8 वाजता हा टँकर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नगरपरिषदेच्या आवारात लावला आहे.
युवा मोर्चा चा हा दणका असाच येत्या काळात भ्रष्टाचारी लोकांना देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष सुशांत हजारे, सामाजिक कार्यकर्ते आदित्य हिंदुस्थानी व युवा मोर्चा शहर सरचिटणीस अजित लेंडवे उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज