टीम मंगळवेढा टाईम्स।
जत तालुक्यातील निगडी खुर्द येथील पृथ्वीराज प्रमोद कोडग (वय १८) याचा सांगोला (जि.सोलापूर) येथील एका स्वीमिंग टँकमध्ये बुडून मृत्यू झाला.
पृथ्वीराज कोडग हा लोहगाव (ता. जत) येथील शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक समितीचे नेते प्रमोद कोडग यांचा मुलगा होता.
प्रमोद कोडग यांचा रविवारी वाढदिवस होता. याच दिवशी त्यांच्या मुलाचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
काही कामानिमित्त कोडग यांचे कुटुंब सांगोला येथे वास्तव्यास आहे. पृथ्वीराजने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती.
रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो दोन मित्रांसह सांगोला येथील स्वीमिंग टँकमध्ये पोहण्यास गेला होता. सर्वजण पोहण्यात व्यस्त होते.
यावेळी पृथ्वीराज पाण्याच्या बाहेर उशिरापर्यंत आला नाही. म्हणून सोबतच्या मित्राने याबाबतची माहिती स्वीमिंग टँक चालकाला दिली.
यावेळी त्यांनी पृथ्वीराज बाहेर गेला आहे की नाही याबाबतची सीसीटीव्हीमध्ये पाहणी केली असता, तो बाहेर गेला नसल्याचे लक्षात आले. संशय आल्याने टँकमधील पाणी उपसले. यावेळी पृथ्वीराज मृतावस्थेत आढळून आला.
यावेळी पृथ्वीराजला पोहण्यासाठी संरक्षणासाठी लाईफ जॅकेट दिली नसल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, स्वीमिंग टँक चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप पृथ्वीराज कोडगच्या नातेवाइकांनी केला आहे.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज