रिद्धी सिद्धी गणपती मंदिरात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक मंगळवेढ्यात येत आहेत, अशोक कोळी यांचे स्वप्न आज साकार झाले; अभिजित पाटील यांचे गौरवोद्गार
टीम मंगळवेढा टाईम्स ।
रिद्धी सिद्धी गणपती मंदिरात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक मंगळवेढ्यात येत आहेत, अशोक कोळी यांचे स्वप्न 40 वर्षातून आज साकार झाले असल्याचे गौरवोद्गार विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी काढले आहे.
मंगळवेढा येथील श्री रिध्दी सिद्धी गणपती मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा व अशोक कोळी यांच्या नागरी सत्कार समारंभा प्रसंगी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गणपती मंदिरात आणणार
भविष्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस पंढरपूर, सोलापूर दौऱ्यावर येतील त्यावेळेस रिध्दी सिध्दी गणपती मंदिरात त्यांना घेऊन येणार असल्याचे आश्वासन खासदार सिध्देश्वर महास्वामी यांनी दिले आहे.
याप्रसंगी रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, उद्योजक वैभव नागणे, उद्योजक आनंद पाटील, विश्व हिंदू परिषेदेचे दादासाहेब वेदक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे, महादेव महाराज बोराडे, पक्षनेते अजित जगताप, शशिकांत चव्हाण, संजय कट्टे, संभाजी रोकडे,हजरत काझी, आदीजन उपस्थित होते.
पाटील पुढे बोलताना म्हणाले की, अशोक कोळी यांनी स्वतःच्या जागेवर गेल्या 40 वर्षांपासून जे काम सुरू केले होते ते आज प्रत्यक्षात नावारूपाला आले आहे. येणाऱ्या काळात मंगळवेढ्यात देखील मोठे तीर्थक्षेत्र विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
दादासाहेब वेदक बोलताना म्हणाले की, आज खऱ्या अर्थाने एका भाविकाने 40 वर्षांपासून पाहिलेले स्वप्न सत्यात साकारले आहे. मंगळवेढ्याच्या इतिहासात प्रथमच हे भव्य दिव्य असे मंदिर आजपासून महाराष्ट्रातील भाविक भक्तांसाठी खुले झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय चेळेकर यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष मिसाळ, राजेंद्र जाधव, भारत दत्तू यांनी केले. तर आभार वित्तलेखा अधिकारी अजित शिंदे यांनी मानले.
दरम्यान याप्रसंगी ज्यांनी ज्यांनी मंदीर स्थापनेत परिश्रम घेतले आहेत त्यांच्या सत्कार कोळी कुटुंबीयांनी केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज