टीम मंगळवेढा टाईम्स ।
एनडीएने राष्ट्रपतीच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावी घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली. एनडीएने महिलांना संधी देणार असल्याचे सांगत आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली.
दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी आपला संयुक्त उमेदवार जाहीर केला आहे.
टीएमसीचे माजी नेते आणि केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना विरोधकांनी उमेदवार म्हणून उभे केले आहे. तर भाजपने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे.
बैठकीला पंतप्रधान मोदींशिवाय पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर अनेक नेते उपस्थित होते.
यशवंत सिन्हा विरोधी पक्षाकडून उमेदवार जाहीर
येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडणार असून, यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.
या दरम्यान, आज विरोधी पक्षांच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदासाठी यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली आहे.
या बैठकीला जयराम रमेश, सुधींद्र कुलकर्णी, दीपंकर भट्टाचार्य, शरद पवार, डी राजा, तिरुची शिवा (डीएमके), प्रफुल्ल पटेल, येचुरी, एनके प्रेमचंद्रन (आरएसपी), मनोज झा, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला, हसनैन मसूदी (नॅशनल कॉन्फरन्स) यांच्यासह अभिषेक बॅनर्जी आणि राम गोपाल यादव हेही या बैठकीला उपस्थित होते.
याशिवाय या बैठकीला ओवैसी यांच्या पक्षाचे खासदार इम्तियाज जलीलही उपस्थित होते. गेल्या बैठकीत AIMIM ला बोलावण्यात आले नव्हते. त्यामुळे बैठकीला उपस्थित राहिलो नसल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज