टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार ६८ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.
मतदान शांततेत पार पडले. मतदान प्रक्रियेत भारत निवडणूक आयोग आणि आरोग्य विभागाने कोरोना विषयक दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले गेल्याची माहितीही त्यांनी दिली.
मंगळवेढा-पंढरपूरमध्ये आज विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान पार पडले. राष्ट्रवादीचे आमदार दिवंगत भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूरमध्ये एक जागा रिक्त झाली होती. याच जागेवर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली होती.
या पोटनिवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई झाली असल्याचे पाहयला मिळाले. राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके म्हणजेच दिवंगत भारत भालके यांचे सुपुत्र यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर भाजपकडून समाधान आवताडेंना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीचा संपूर्ण पाठींबा राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना होता. मंगळवेढा पंढरपूरमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ७ वाजेपर्यंत सरासरी 68 टक्के मतदानाची नोंद झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पंढरपूर पोटनिवडणूकीच्या रिंगणात एकूण १९ उमेदवार उतरले आहेत. मात्र यातील मुख्य निवडणूकीचे आकर्षण हे भाजप आणि राष्ट्रवादीत आहे.
राष्ट्रवादीसाठी पंढरपूर निवडणूक प्रतिष्ठेची ठरत आहे. तर भाजपनेही आपली ताकद पणाला लावली आहे. या निवडणूकीत दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान झाले होते. मतदानाच्या दिवशी नागरिकांध्ये प्रचंड उत्साह पाहण्यास मिळाला आहे.
कोरोनाचे संकट घोंघावत असले तरी सूज्ञ नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत मतदानाचा हक्क बजावला आहे. तर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनीही मतदान केले आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवर भगीरथ भालके यांनी देखील सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. आतापर्यंत १७८१९० पैकी १ लाख ३ हजार ६४१ पुरुषांनी मतदान केले आहे. तर १६२६९४ पैकी ९३ हजार ४१४ महिलांनी मतादनाचा हक्क बजावला आहे. असे एकूण १ लाख ९७ हजार ५५ नागरिकांनी मतदान केले आहे. ही आतापर्यंतची आकडेवारी असून संध्याकाळी ७ पर्यंत मतदानाची वेळ असल्यामुळे अंतिम आकडेवारी मतदान संपल्यानंतर जाहीर करण्यात येईल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज