mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आश्‍चर्याचा धक्का! प्रशांत परिचारक बँकेच्या संचालक पदभारातून मुक्त; या मोठ्या निर्णयाचे कारण जाणून घ्या…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 13, 2023
in राजकारण, सोलापूर
मुख्यमंत्री उजनीचे पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय रद्दची घोषणा करत नाहीत; तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही : आ.परिचारक

टीम मंगळवेढा टाईम्स। 

पंढरपूर अर्बन सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यमान अध्यक्ष माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीच आपला अर्ज मागे घेत सार्‍यांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे.

दरम्यान, विरोधी समविचारी आघाडीने केलेले अपील सहायक निबंधक पुणे यांनी फेटाळून लावल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

या निवडणुकीत मनसेचे नेते दिलीप धोत्रे व सहकार्‍यांनी समविचारी आघाडी स्थापन करून परिचारक गटाला आव्हानं दिले होते. मात्र, त्यांचे सर्व अठरा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अवैध ठरविल्याने त्यांनी सहायक निबंधक पुणे यांच्याकडे दाद मागितली होती.

मात्र, तेथे ही विरोधकांना दिलासा मिळाला नाही. सर्व उमेदवारी अर्ज बुधवारी नामंजूर करण्यात आले.

दरम्यान, आज १२ जानेवारी हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. सत्ताधारी परिचारक गटाने सतरा जागांसाठी अठरा अर्ज दाखल झाले होते.

गुरूवारी सकाळी प्रशांत परिचारक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. यामुळे परिचारक गटातील कार्यकर्त्यांसह विरोधकांमधून देखील आश्‍चर्य व्यक्त केले जात होते. मात्र, प्रशांत परिचारक यांचे चुलत बंधू राजाराम परिचारक यांचा संचालक मंडळात समावेश आहे.

प्रथमच त्यांना बँकेवर काम करण्याची संधी मिळाली आहे. पंढरपूर अर्बन बँकेच्या सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरात ३१ शाखा असून २ हजार ९०० कोटीची उलाढाल आहे. ११० वर्षाची ही बँक सोलापूर जिल्ह्यात नामांकीत म्हणून ओळखली जाते.

परिचारक गटाचे आता सतरा जागांसाठी सतराच अर्ज शिल्लक असून यात राजाराम परिचारक, रजनीश कवठेकर, हरीश ताठे, सतीश मुळे, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, पांडुरंग घंटी, ऋषिकेश उत्पात, गणेश शिंगण, अनंत कटप, अमित मांगले, व्यंकटेश कौलवार, मनोज सुरवसे, गजेंद्र माने, अनिल अभंगराव, माधुरी जोशी, डॉ. संगीता पाटील यांचा समावेश आहे.

बँकेच्या संचालक पदभारातून मुक्त होत आहे

अर्ज माघारी घेतल्यानंतर परिचारक म्हणाले, यामध्ये काही वेळा थांबणे ही गरज बनते. २००२ मोठे मालक तथा स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी बँकेत सेवेची संधी दिली होती. वीस वर्षानंतर आता नवीन युवकांना संधी देऊन संस्था भविष्यात वाढली पाहिजे, टिकली पाहिजे.

यासाठी नवीन पिढी तयार झाली पाहिजे. या दृष्टीकोनातून बँकेच्या संचालक पदभारातून मुक्त होत आहेत. तसेच आपल्या राजकीय जीवनाचा संस्थेवर परिणाम होवू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याने त्यांनी नमूद केले

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.प्रशांत परिचारक

संबंधित बातम्या

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

खुशखबर! सोलापूर-मुंबई विमानसेवा ‘या’ दिवसापासून; पहिल्याच विमानाने मुख्यमंत्री फडणवीस येणार सोलापूरला

October 13, 2025
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

October 13, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

इच्छुकांमध्ये उत्सुकता! जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आज आरक्षण सोडत; मंगळवेढा पंचायत समितीची सोडत कुठे होणार? वाचा संपूर्ण माहिती

October 13, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

नेत्यांनो..! महायुती की स्वबळावर? निवडणूक लढवायची निर्णय घेण्याचे अधिकार ‘यांना’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले अधिकार

October 13, 2025
एक हात मदतीचा! मंगळवेढ्यातील अनाथ आणि दिव्यांग मुलांनी बनवल्या 5 हजार पणत्या; मुक्ताई अनाथ मतिमंद संस्थेकडून 9307286287 नागरिकांनी पणत्या खरेदी करण्याचे आवाहन

एक हात मदतीचा! मंगळवेढ्यातील अनाथ आणि दिव्यांग मुलांनी बनवल्या 5 हजार पणत्या; मुक्ताई अनाथ मतिमंद संस्थेकडून 9307286287 नागरिकांनी पणत्या खरेदी करण्याचे आवाहन

October 11, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

बापरे..! मंगळवेढ्यात असलेल्या ‘या’ बँकेत ठेवीदारांनी केली मोठ्या प्रमाणावर गर्दी; शाखेत ‘एवढ्या’ कोटींच्या ठेवी; ठेवीदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि घबराट

October 10, 2025
काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

जबरदस्त ऑफरचा वर्षाव! शीतल कलेक्शनमध्ये भव्य ‘स्वरनिका साडी महोत्सवाचे आयोजन; दीपावली निमित्ताने कपडे खरेदीवर मिळावा मोत्याचा दागिना मोफत

October 12, 2025
महिलांनो! मंगळवेढा मधील सगळ्यात मोठा स्वस्त होलसेल साडी डेपो; महिलांना कमी दरात मिळत आहेत ब्रँडेड साड्या; ब्रँडेड रेडिमेड ब्लाउजचा सुपर सेल ‘बाहुबली साडी डेपो’मध्ये तुफान गर्दी

महिलांनो! मंगळवेढा मधील सगळ्यात मोठा स्वस्त होलसेल साडी डेपो; महिलांना कमी दरात मिळत आहेत ब्रँडेड साड्या; ब्रँडेड रेडिमेड ब्लाउजचा सुपर सेल ‘बाहुबली साडी डेपो’मध्ये तुफान गर्दी

October 9, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ बड्या बँकेवर रिझर्व्ह बँकेने घातले निर्बंध; नवीन ठेवी घेणे-देणे, कर्ज वितरणावर करणाऱ्यावर घातली बंधने

October 8, 2025
Next Post
विद्यार्थ्यांनो! टीईटी आणि नेट परीक्षा एकाच दिवशी, एसटी संपामुळे उमेदवारांची गैरसोय; टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! सोलापूर विद्यापीठाच्या 'या' तारखेपासून परीक्षा सुरु; केंद्रांवर असणार करडी नजर

ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

खुशखबर! सोलापूर-मुंबई विमानसेवा ‘या’ दिवसापासून; पहिल्याच विमानाने मुख्यमंत्री फडणवीस येणार सोलापूरला

October 13, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या नेमक्या तारखा आणि परीक्षा दिनक्रम

October 13, 2025
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

October 13, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

इच्छुकांमध्ये उत्सुकता! जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आज आरक्षण सोडत; मंगळवेढा पंचायत समितीची सोडत कुठे होणार? वाचा संपूर्ण माहिती

October 13, 2025
भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात; कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करू; चेअरमन अनिल सावंत यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन

भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात; कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करू; चेअरमन अनिल सावंत यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन

October 12, 2025
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्या संदर्भात आज सायंकाळी तातडीची बैठक

October 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..