टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढयाचे ग्रामदैवत हजरत गैबीपीर ऊरूस कमिटीच्या सरपंचपदी प्रशांत गायकवाड यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर उपसरपंचपदी अण्णासाहेब ओमणे व प्रमोद सावंजी यांची निवड करण्यात आली आहे.
हजरत गैबीपीर ऊरूस कमिटीची रविवार रात्री ८.०० वा गैबीपीर दर्गाहमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रशांत गायकवाड यांची सरपंचपदी व मुजावर पंच म्हणून जावेद मुजावर यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर दामाजी मंदिर अध्यक्ष विष्णूपंत आवताडे यांच्या हस्ते नूतन सरपंच प्रशांत गायकवाड, जावेद मुजावर यांचा सत्कार करण्यात आला.
सरपंच प्रशांत गायकवाड यांनी केलेले समाजोपयोगी काम पाहता त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष बाबुभाई मकादानदार माजी उपनगराध्यक्ष पै.ज्ञानेश्वर भगरे, मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन लक्ष्मण चेळेकर, माजी सरपंच पांडूरंग नाईकवाडी, चंद्रकांत पडवळे, मुरलीधर सरकळे, युवराज शिंदे,
नगरसेवक राहुल सावंजी, शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम कुदळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजाभाऊ चेळेकर, विष्णूपंत जगताप,
सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष संभाजी घुले, माजी अध्यक्ष राहुल वाकडे, बलवान वाकडे, गौस मुजावर बबलू सुतार, हिरालाल तांबोळी मुन्ना मुजावर,अझर मुजावर, आण्णा ओमने, प्रमोद सावंजी, किसन गायकवाड, अर्जुन देवकर , अक्रम मुजावर , हणमंत पवार , इरफान मुजावर , संदिप बुरकूल , किरण घोडके,
सचिन साळुंखे , विनायक हजारे , मनोज माळी , नितीन बाबर , प्रशांत गजेंद्रगडकर , अल्ली शेख , रमेश जाधव , फारुक मुजावर , बबलू, शेख , रविराज बुरकूल , प्रितम बुरकूल , राजवीर गायकवाड,
अनिल पाटील , अजित सरकळे सोमनाथ भगरे , अनिल पवार विजय भगरे , राजू दारुवाले , परमेश्वर पाटील तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्रकुमार जाधव यांनी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज