टीम मंगळवेढा टाईम्स।
पंढरपूर – मंगळवेढा विजयपूर हायवेवर भालेवाडी फाटा येथे धोकादायक ठिकाणी प्रादेशिक परिवहन विभागाचे फिरते वाहन पथकाचे चेक पोस्ट उभारले गेले असून, हे चेक पोस्ट चुकीच्या ठिकाणी उभे केले आहे. हा परिसर अपघातप्रवण असून या ठिकाणचे चेक पोस्ट तत्काळ हटवावे,
यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटनेने परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
या आठवड्यात न हलवल्यास सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी प्रहार संघटना पंढरपूर विजयपूर हायवेवर भालेवाडी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रा. संतोष पवार, युवा आघाडीचे नेते धन्यकुमार पाटील यांनी दिला आहे.
पंढरपूर-मंगळवेढा-विजयपूर हायवे हा रस्ता ८० किमी ताशी स्पीड मर्यादेचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शेकडो अपघात झाले आहेत आणि बरेच जण मृत्युमुखीही पडले आहेत. दुष्काळात तेरावा महिना म्हणून आरटीओ विभागाचे फिरते चेक पोस्ट याच ठिकाणी झाले आहे.
जिथे भालेवाडी, फटेवाडी, तळसंगी, मरवडे आणि मंगळवेढा हे सगळे रस्ते एकत्र येतात. आणि चेक करणारी वाहने सुद्धा रस्त्यावर उभारली जातात. त्यामुळे या अपघातप्रवण क्षेत्रात पुन्हा अपघात होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे येथील धोकादायक ठिकाणी उभारलेले फिरते वाहन चेक पोस्ट हलवावे, अशा आशयाचे निवेदन २७ जानेवारी रोजी दिले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज