टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुणे येथे नोकरी करीत स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या सोलापूरच्या तरुणीचा पुणे येथे अभ्यासिकेमध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
पूजा वसंत राठोड (वय २५, कोंडी तांडा, उत्तर सोलापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. मूळची कोंडी तांडा येथील तरुणी पूजा ही बहिणीसोबत पुणे येथे राहत होती.
पूजा राठोड ही खासगी कंपनीमध्ये काम करत स्पर्धा परीक्षेची देखील तयारी करीत होती. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पुण्यातील अभ्यासिकेमध्ये अभ्यास करीत असताना तिला हृदयविकाराचा झटका आला.
यावेळी शेजारी अभ्यास करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र सायंकाळी तिचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ- बहिण असा परिवार आहे.(स्रोत:पुढारी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज