mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सावधान! डाळिंब व्यापाऱ्याची 39 लाखांची फसवणूक; सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 12, 2020
in क्राईम, सोलापूर
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

डाळिंब व्यापाऱ्याने पाठवलेले दोन ट्रकमधील 38 लाख रुपयांचे 33 टन डाळिंब परराज्यातील व्यापाऱ्याला सांगितलेल्या ठिकाणी पोच न केल्याने सांगोल्यातील डाळिंब व्यापाऱ्याची 39 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक झाली.

याप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.डाळिंब व्यापारी प्रताप श्‍यामराव येलपले (रा. अजनाळे, ता. सांगोला) हे शेतकऱ्यांकडून डाळिंब खरेदी करून व्यापाऱ्यांना पोच करण्याचे काम करतात. त्यांच्या मार्केटिंग केंद्रावर अब्दुलकरीम सलीम शेख (रा. उगाव, ता. निफाड, जि. नाशिक) हा मॅनेजर म्हणून कामास आहे.

मॅनेजर अब्दुल करीम शेख यास त्याच्या गावाकडील वाहन मालक शैला नामदेव पानगव्हाणे यांचा मुलगा वैष्णवी ऊर्फ बबलू याने फोन करून, आमच्या वाहनांना सांगोल्याहून भाडे मिळवून द्या, तसेच माझ्या वडिलांचा मित्र नवलकिशोर सिंग यांचा ट्रक तुमच्याकडेच भाड्याने लावत असल्याचे सांगितले.

त्यानुसार प्रताप येलपले यांच्या केंद्रावर एमएम 15/ईजी 97 14 या ट्रकवर वाहनचालक मारुती ढोली (रा. जेलरोड, नाशिक) व डब्ल्यूबी 23/डी 3714 या दुसऱ्या ट्रकवर अर्जुन पासवान वाहनचालक होता. 7 नोव्हेंबर रोजी दोन्ही ट्रकमध्ये कोलकता व गोजाडांगा येथील व्यापारी एंटरप्राइजेस व मछवा मार्केट फलमंडी येथील व्यापारी एम. के. एल. मोहम्मद कामिल यांना हे डाळिंब पोच करण्यास सांगितले होते.

दोन्ही ट्रकमध्ये प्रत्येकी 19 लाख रुपये किमतीचे साडेसोळा टन डाळिंब भरून पाठवण्यात आले.ट्रक पाठवताना दोन्ही वाहनचालकांना प्रत्येकी 22 हजार रुपयांचे डिझेल भरून खर्चापोटी प्रत्येकी 19 हजार 500 रुपये रोख रक्कम व दोन्ही वाहनचालकांच्या खात्यात प्रत्येकी 28 हजार 500 रुपये भरले होते.

दोन्ही वाहने कोलकता येथे 10 डिसेंबर रोजी सकाळी पोचणे अपेक्षित होते. वाहने वेळेवर न पोचल्याने दोन्ही वाहनचालकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दोघांचेही मोबाईल बंद असल्याने संपर्क झाला नाही.

या वेळी प्रताप येलपले यांनी वाहन मालकाचा मुलगा वैष्णवी ऊर्फ बबलू पानगव्हाणे यांना मोबाईलवर विचारपूस केली असता त्यांचे वडील नामदेव पानगव्हाणे यांनी, आमच्या खात्यात 22 लाख रुपये जमा करा, तुमचा माल मी पुढे पाठवतो. जर तुम्ही पैसे न दिल्यास तुमचा माल मी दुसऱ्यास विकून टाकतो, असे सांगितले.

वाहनमालकाचा मुलगा व त्याचे वडील, दोन्ही वाहनांचे चालक यांनी संगनमत करून 39 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रताप येलपले यांनी वाहनचालकाचा पती नामदेव पानगव्हाणे, त्यांचा मुलगा वैष्णवी ऊर्फ बबलू पानगव्हाणे, वाहन चालक मारुती ढोली व अर्जुन पासवान यांच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डाळींबफसवणूकव्यापारी

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामस्थांना कोणतीही माहिती न देता बोगस ग्रामसभा दाखवून गावात बियर बारला दिले नाहरकत प्रमाणपत्र; सरपंच व सदस्यपद केले रद्द

August 9, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! ट्रॅक्टरमध्ये करंट उतरल्याने सोलापुरात दोन शेतकऱ्यांचा शेतात मृत्यू; दोघांना वाचवायला गेलेला एक जण जखमी

August 8, 2025

मेडिकल औषधे घेवून जाणाऱ्या विवाहित महिलेचा विनयभंग; युवकावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 8, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

ह्रदयद्रावक..! पावसामुळे गाईच्या गोठ्यात विजेचा प्रवाह; सासूसह सुनेचा मृत्यू, गायही दगावली, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

August 7, 2025

खळबळ! विट्यात दोन अट्टल दुचाकी चोरटे जेरबंद; 1 लाख 79 हजारांच्या दुचाकी जप्त; मंगळवेढा तालुक्यातील एकाचा समावेश

August 7, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

काळजी घ्या! मिरवणुकीत नाचून दमला, छातीत दुखल्याने जागीच कोसळला; सोलापूरात डीजेच्या तालावर नाचताना तरुणाला हार्ट अटॅक, जागवेरच जीव सोडला, नेमकं काय घडलं?

August 6, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे-पाटील आज सोलापुरात; असा असणार दिवसभर नियोजन; काय निर्णय जाहीर करणार?

August 6, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! दोनच महिन्यांपूर्वी झाला होता विवाह, व्हिडीओ बनवून, लोकेशन पाठवून सोलापूरच्या तरुणाने केली आत्महत्या

August 4, 2025
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

गौण खनिजाची अवैध वाहतूक कराल तर खबरदार…! पर्यावरण संरक्षण अधिनियम, खाण आणि खनिज अधिनियमांतर्गत फौजदारी स्वरुपाचे होणार गुन्हे दाखल

August 4, 2025
Next Post
मंगळवेढ्यातील दुकानाची वेळ आजपासून ‘ही’ असणार, ‘या’ नियमांचे असणार बंधन

मंगळवेढेकरांसाठी महत्त्वाची बातमी! दिवाळीत 'या' नियमांचे पालन करा, अन्यथा होईल कारवाई

ताज्या बातम्या

कत्तलखान्याकडे जाणारी ३१ जनावरे पकडली; मंगळवेढ्यातील दोघांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

पिसाळलेला कुत्रा म्हशीला चावला, कोण मेलं असेल? अन् महाराष्ट्रातील ‘या’ गावावर रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी लोकांनी का केलीय गर्दी?

August 9, 2025
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामस्थांना कोणतीही माहिती न देता बोगस ग्रामसभा दाखवून गावात बियर बारला दिले नाहरकत प्रमाणपत्र; सरपंच व सदस्यपद केले रद्द

August 9, 2025
धक्कादायक! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात ४० शेळ्या- मेंढ्या दगावल्या; मृत्यूचे कारण आले पुढे…काळजी घेण्याचे आवाहन

दुःखाचा डोंगर कोसळला! मंगळवेढ्यात विषारी वनस्पती पाला खाऊन १०० मेंढ्या, शेळ्या मृत्युमुखी; २५ लाखांचे अचानकपणे नुकसान; कधीही भरून न येणारी झाली आर्थिक हानी

August 9, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! ट्रॅक्टरमध्ये करंट उतरल्याने सोलापुरात दोन शेतकऱ्यांचा शेतात मृत्यू; दोघांना वाचवायला गेलेला एक जण जखमी

August 8, 2025

मेडिकल औषधे घेवून जाणाऱ्या विवाहित महिलेचा विनयभंग; युवकावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 8, 2025
रेनबो किड्स इंग्लिश मिडीयम स्कूलमुळे सलगर परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार, उद्याच्या उज्वल पिढीला साक्षरतेचे पैलू पडतील; आ.समाधान आवताडे यांचे गौरोउद्गार

रेनबो किड्स इंग्लिश मिडीयम स्कूलमुळे सलगर परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार, उद्याच्या उज्वल पिढीला साक्षरतेचे पैलू पडतील; आ.समाधान आवताडे यांचे गौरोउद्गार

August 8, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा