मंगळवेढा टाईम्स न्युज।
मंगळवेढा तालुक्यातील दामाजीनगर जिल्हा परिषद गटातून रामचंद्र नागनाथ सलगर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. माघार घेण्याच्या पहिल्याच दिवशी ही एकमेव माघार ठरली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटातून एकूण ४० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. तसेच पंचायत समितीच्या आठ गणांतून ८४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

काल शुक्रवारी माघार प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी संत दामाजीनगर जिल्हा परिषद गटवगळता इतर कोणताही गट किंवा गणातून एकही उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आलेला नाही, अशी माहिती निवडणूक सुत्रांनी दिली.

माघार प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात कोण उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोरेंचे वक्तव्य.. भालकेंची चर्चा..
पंढपरपुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भगीरथ भालके यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना म्हणाले, पंढरपुरात काही जुन्या विचारांची माणसं भाजपमध्ये येत असतील, त्यांचे स्वागतच आहे.

मात्र, भालके यांच्या प्रवेशाबाबत स्पष्ट बोलले टाळले. सगळ्या गोष्टी एकाच वेळी सांगायच्या नसतात. म्हणून त्यांनी विषय बदलला. मात्र, विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे व अॅड. गणेश पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे आता पंढरपुरात राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

कारण, काळे यांनी भालकेंना अनेकवेळा मदत केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भालकेदेखील भाजपमध्ये जाणार की काय, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.

सध्या आमदार अभिजित पाटील यांच्या विरोधात विठ्ठल परिवारातील नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे विठ्ठल परिवारातील नेते भाजपमध्ये जात असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











