टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर येथील देगाव टोळ नाक्यावर सलगर वस्ती पोलिसाकडून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला उपचारासाठी जातानाही दंडात्मक कारवाई केली जात असल्याने त्याचा आर्थिक फटका पॉझिटिव्ह रुग्णांना बसत असून पोलिस प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या घटनेची हकिकत अशी,घरनिकी ता.मंगळवेढा येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक मधुकर गुलाब पवार (वय 48) हे कर्तव्यावर असताना पॉझिटिव्ह आले होते.त्यांच्यासोबत त्यांची आई,पत्नी व मुलगा असे कुटुंबच पॉझिटिव्ह आल्याने हे सर्वजण सोलापूर येथे उपचारासाठी गेले होते.
उपचार करून दि.12 मे रोजी सायंकाळी 5.45 वा. मंगळवेढयाकडे एम एच.13 सी.के. 1091 या चार चाकी वाहनातून येत असताना सोलापूर देगाव येथील टोळ नाक्यावर असलेल्या एका अधिकार्यासह चार पोलिस कर्मचार्यांनी त्यांचे वाहन अडवून तुमच्याकडे पास नसल्याने दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे बजावले.
यावर ग्रामसेवक पवार यांनी जिल्हयात पासची गरज नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर पोलिसांनी पासला बगल देत मास्क नसल्याचे सांगून पाचशे रुपये दंडाची पावती फाडली.
यावर ग्रामसेवक पवार म्हणाले,आम्ही सर्वजण मास्क लावले असताना दंड कशासाठी अशी विचारणा केली असता दवाखान्याला पाच लाख रुपये बिल भरता इकडे पाचशे रुपये दंड भरावयास जास्त आहे का असा सवाल करून ग्रामसेवकाच्या हातावर दंडाची पावती टेकवली.
यावेळी ग्रामसेवक पवार यांनी आम्ही सर्व कुटुंब पॉझिटिव्ह असल्याने उपचारासाठी सोलापूरला गेलो होतो. संबंधित डॉक्टरांची फाईलही दाखवली.तसेच मी सरकारी ग्रामसेवक कर्मचारी असून कोरोनाच्या पहिल्या फळीत काम करणारे आहोत.
त्याचबरोबर त्यांनी स्वतःचे ओळखपत्रही दाखवले मात्र पोलिस कुठल्याही परिस्थितीत त्यांचे म्हणणे ऐकायला तयार नव्हते.परिणामी अखेर ग्रामसेवकाने खिशातील पाचशे रुपये काढून दंडाची रक्कम भरल्यानंतर त्या पॉझिटिव्ह पवार कुटुंबाची सुटका झाली.
शासनाने मोकाट फिरणार्यावर ,मास्क न लावणे,बाहेरच्या जिल्हयातून येणार्यांची पासची तपासणी करणे,चार चाकी वाहनात आर.टी.ओ पासींगच्या 50 टक्केच्या पुढे प्रवासी असल्यास कारवाई करणे आदीबाबत कारवाईसाठी पोलिस प्रशासनास सूचना देण्यात आल्या असताना येथे मात्र चक्क पोलिस स्थानिक पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनाच दंडात्मक कारवाई करून कसा त्रास देतात.
याचे ज्वलंत उदाहरण नुकतेच नागरिकांना पहायवयास मिळाले असून शहर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी यापुढे अशा घटना घडून नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी तसेच या घटनेची चौकशी करून संबंधित पोलिस कर्मचार्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मी सरकारी नोकरदार असून कारवाई
माझे कुटुंब पॉझिटिव्ह आल्याने उपचार करून मंगळवेढयाकडे परत येत असताना देगाव टोळ नाक्यावर सलगर वस्ती पोलिसांनी पास नसल्याच्या कारणावरून दंडात्मक कारवाई केली.
सोलापूर जिल्हयात पासची आवश्यकता नसल्याचे सांगताच मास्कची कारवाई म्हणून पाचशे रुपये दंड आकारला, दवाखान्याला लाखो रुपये बिले भरता इकडे पाचशे रुपये दंड भरण्यास तुम्हाला काय झाले? असे म्हणून दंड वसूल केला.
मी सरकारी नोकरदार व कोरोना काळात पुढच्या फळीत काम करीत आहे.पोलिस आयुक्त यांनी चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करावी. – मधुकर पवार, ग्रामसेवक घरनिकी, मारापुर
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज