मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी हद्दीत गांजाचे मादक व नशाकारक वनस्पतीच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून
43 किलो 958 ग्रॅम वजनाचा गांजा 8 लाख 79 हजार 160 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सोमण्णा रामण्णा बिराजदार (वय 58 रा.सोड्डी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, सोड्डी परिसरात असलेल्या गट नं.324/1/ब/2 मध्ये गांजाची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती नुकताच महाराष्ट्र शासनाचा आदर्श पुरस्कार मिळालेले पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना मिळताच त्यांनी पोलिसांचे एक खास पथक पाठवून सदर घटनेची शहनिशा करून घेतली.
तदनंतर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधिक्षक प्रितम यावलकर, मंगळवेढ्याचे डी.वाय.एस.पी.विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची सुत्रे हालवून दि.5 रोजी 3.15 वा. सदर पथक शासकिय गाडीने घटनास्थळी पोहोचले.
त्यावेळी वरील आरोपी उपस्थित होते. त्यांना आपल्या शेतात कोणकोणती पिके आहेत असे पथकाने विचारले असता शेतात जवस, सिताफळ, चिक्कू, पपईची लागवड केल्याचे आरोपीने सांगितले.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शेतामध्ये शोध घेतला असता दगडी घराच्या बांधकामाच्यासमोर जवसाच्या पिकासोबत साधारण दोन फुटापासून सहा फुट उंचीची लहान मोठी गांजाची हिरव्या रंगाची पाने फुले व बोंडे असलेली झाडे पोलिसांच्या निदर्शनाला आली.
याबाबत आरोपीस विचारणा केली असता गांजा सेवन करण्याची सवय असल्याने ती चोरून लावली असल्याचे आरोपीने पथकासमोर सांगितले. पोलिसांनी 43.958 किलो ग्रॅम वजनाचा गांजा त्याची किंमत 8 लाख 79 हजार 160 रुपये आदी मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईसाठी सहाय्यक पोलिस निरिक्षक अंकुश वाघमोडे, पोलिस उपनिरिक्षक विजय पिसे, नागेश बनकर, अनिल गडदे, पोलिस हवालदार दिगंबर गेजगे, पो.ना. सचिन बनकर, पोलिस अंमलदार महेश कोरे, सुरज देशमुख, बंडोपंत पुजारी,
श्रीकांत देवकते, चालक हरीदास चौधरी आदींनी परिश्रम घेतले. याची फिर्याद पोलिस नाईक सचिन बनकर यांनी दिली असून याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान मंगळवेढा पोलिस दलात प्रथमच एवढा मोठा गांजा लागवड सापडल्याने खळबळ उडाली आहे.
सदरचे ठिकाण हे कर्नाटक सीमेपासून केवळ 7 ते 8 किमी. अंतरावर असल्याने तस्करी करण्याचा इरादा असावा असा संशय परिसरातील जनतेतून व्यक्त होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज