टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यात हुलजंती येथे समाज मंदिराशेजारी गोलाकार बसून मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून ३ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दहाजणांविरूध्द महाराष्ट्र पोलिस जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार कारवाई करण्यात आली.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, दि.१५ रोजी दुपारी ३.१० वा. हुलजंती दुरक्षेत्र हद्दीत खाजगी वाहनाने पोलिस पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हुलजंती गावातील समाज मंदिराशेजारी ५२ पत्त्याचा मन्ना नावाचा जुगार खेळत आहेत.
पोलिसांनी सदर ठिकाणी जावून पाहणी केली असता यामध्ये आरोपी संतोष सिद्राम अक्की (वय ४०), म्हाळाप्पा परसाप्पा बंडगर (वय ४९), गौतम कोमन्ना कांबळे (वय म्हाळाप्पा ५८), सिद्दाप्पा पेटरगी (वय ५८), चंद्राकांत शिवाप्पा निगडे (वय ४२),
तिपण्णा बाळाप्पा कोटे (वय ४२), किशोर हुवाप्पा भोरकडे (वय ४०) सर्व रा. हुलजंती, चिदानंद तेलगाव (वय रायगोंडा शिवाप्पा ४८), इश्वराप्पा बगली (वय ४० रा. शिरढोण),
शिवाजी सोमराया जकवडर (वय ३५) आदी सदर ठिकाणी गोलाकार रिंगण करून ५२ पत्त्याच्या पानावर मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
सदर ठिकाणाहून पोलिसांनी ३ हजार ९५० रुपये रोख रक्कम, पेन, पत्त्याचा डाव पोलिसांनी जप्त केला. याची फिर्याद पोलिस नाईक सचिन बनकर यांनी दिली आहे.
दरम्यान, तालुक्यात मरवडे रोड, सांगोला रोड आदी ठिकठिकाणी देखील चोरीचुपके सुरू असणारे जुगार अड्डे बंद करावेत अशी मागणी देखील महिला वर्गातून होत आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज