टीम मंगळवेढा टाईम्स ।
मेडसिंगी ता.सांगोला येथील माण नदीपात्रातून बेकायदा वाळू घेवून लक्ष्मी दहिवडी हद्दीत येणारा वाळूचा ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त करून सतीश दामोदर इंगवले (वय 38),शरद अभिमन्यू इंगवले (वय 33) दोघे रा.मेडसिंगी या दोघांना
पोलिसांनी अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, मंगळवेढयाचे पोलिस निरिक्षक रणजित माने यांना लक्ष्मी दहिवडी हद्दीत दि. 21 रोजी चोरून वाळू येत असल्याची माहिती मिळताच त्यांनी
पोलिस हवालदार मुळे,पोलिस नाईक पठाण,पवार व मोरे यांना याबाबत माहिती देवून सदर ठिकाणी जाणेस सांगितले असता एम एच 45 एफ 3667 या क्रमांकाचा सुराज्य ट्रॅक्टर पाठीमागे ट्रॉली लावलेला येत असल्याचे निदर्शनास आले.
वरील दोघा आरोपीकडे ट्रॉलीत काय आहे असे विचारले असता अफ्रुका नदीतून वाळू आणल्याचे सांगितले. परवान्याबाबत पोलिसांनी चालकाकडे चौकशी केली असता परवाना नसल्याचे म्हणाले.
पोलिसांनी वाळू व ट्रॅक्टरसह 5 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस शिपाई सोमनाथ माने यांच्या फिर्यादीवरून
वरील दोघांविरूध्द वाळू चोरीचा व पर्यावरण संरक्षण कायदयान्वये गुन्हा दाखल केला.याचा अधिक तपास पोलिस नाईक पठाण हे करीत आहेत
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज