टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील भिमा नदीपात्रातून वाळू चोरी केल्या प्रकरणातील मागील दिड वर्षापासून फरार असलेला आरोपी भास्कर धर्मराज शिवशरण याला पकडण्यात
बोराळे बीटच्या पोलिसांना यश आले असून त्याला अटक करून न्यायालयात उभे केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, दि.8 मे 2021 रोजी पहाटे 5.45 वा.माचणूर येथील भिमा नदीच्या पात्रात आरोपी भास्कर शिवशरण हा आर टी ओ नंबर नसलेल्या टेंपोमध्ये दाेन ब्रास वाळू चोरी करून फरार झाला होता.
याची फिर्याद तत्कालीन मंडलाधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिल्यावर आरोपीविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. फरार आराेपी घरी आल्याची माहीती बोराळे बीटचे पोलिस हवालदार महेश कोळी यांना मिळताच
पाे.नि. रणजित माने यांचे मार्गदशनीखाली तुकाराम कोळी, ईश्वर, दुधाळ, सोमनाथ माने आदी पोलिस कर्मचार्यांनी दि.28 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 वा.माचणूर येथील राहत्या घरी छापा टाकून आरोपी झोपेत असताना पकडले.
दरम्यान,आरोपीला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दि.1 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान तब्बल दीड वर्षानंतर वाळू चोरीतील आरोपीला बोराळे बीटच्या पोलिसांनी पकडून जेरबंद केल्यामुळे त्यांच्या कामगिरीबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांमधून खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर वाळू चोरीतील वाहन जप्त केले होते मात्र आरोपी हा दि.8 मे 2021 पासुन फरार असल्याने तो सापडत नव्हता.वाळू चोरीतील तो सराईत असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज