टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील भीमा नदी पात्रात पुलाजवळ बेकायदा वाळू उपसा करणारा ट्रक पाेलीसांनी पकडून वाळू व ट्रक आसा दोन लाख 53 हजाराचा मुद्देमाल जप्त करून आज्ञात ट्रकचालक, ट्रक-मालक व दोन मजूर यांच्याविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी माचणूर येथिल नदीपात्रात पुलाजवळ बेकायदा वाळू उपसा काही लाेक करीत आसल्याची गाेपनिय माहीती पाे.नि.रंजित माने यांना मिऴताच त्यांनी सहाय्यक पाे.नि.अमाेल बामणे, पोलीस शिपाई दतात्रय मिसाळ,
पोलीस शिपाई सुरजित कदम आदींना पाठवुन प्रत्यक्ष भीमा नदी पात्राला भेट दिल्यावर पाेलीसांना पहाताच दाेन इसम आंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
एम.एच.१२/F ९८०६ हा ट्रक जागेवरच उभा हाेता पाठीमागील हाैदात आर्धा ब्रास वाळू पाेलीसांना दिसुन आली, हा बेकायदा वाळू उपसा दि.८ च्या रात्री १.वाजून ४० मिनीटांनी चालु हाेता.
पाेलीसांनी ३ हजाराची वाळू व २ लाख ५० हजाराचा ट्रक आसा ऐकुण २ लाख ५३ हजाराचा मुद्दे माल जप्त केला आसुन ट्रक पाेलीस स्टेशन आवारात आनुन लावला आहे.
याची फिर्याद मळसिध्द काेळी यांनी दिली आसुन आधिक तपास पाेलीस हवालदार महेळ काेळी करीत आहेत.सद्या भिमानदीत पाणी पातळी कमी झाल्याने रात्रीच्यावेळी माेठा वाळू उपसा सुरू आहे.
दरम्यान शासनाच्या मालमत्तेची लय लुट हाेत आसतानाही महसुल खाते मात्र ताेंडावर बाेट हाताची घडी घालुन आसल्याचा आराेप जानकार नागरीकामधून हाेत आहे.
नदी काठावरील गावच्या सजेतील तलाठी व वाळू दलाल यांच्या आसलेल्या हित संबधातुन वाळू उपसा सुरू आसल्याचा बाेलबाला सुरू आसुन तळे राखेल ताे चाखेल आशा तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत,
जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी वाळू दलालाशी लागेबांधे ठेवनार्य तलाठ्यांचे व पोलीसांचे माेबाईल चेक करून शासनाला डूबवनाऱ्यावर कडक कारवाई करावी आशी मागणी जाेर धरत आहे.
भिमा व माण नदीतुन बेसुमार वाळू उपसा सुरू आसल्याने आनेकांच्या बांधकामावर वाळूचे भले माेठे ढिगारे रात्रीच्या वेळी पडत आसल्याचे नागरीकांच्या निदर्शनास येत आहेत.
महसुल विभाग व पाेलीस प्रशासन या दाेघानी कारवाईची माेहीम हाती घेतली तरच शासकिय मालमत्ता वाचेल आन्यथा नद्याचे पात्र भकास व्हाँयला वेळलागनार नसल्याच्या भावना व्यक्त हाेत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज