टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर येथे मराठा आरक्षण मोर्चासाठी जात असताना सोलापूर रोडवरील देगाव येथे आ.समाधान आवताडेसह माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सोलापुरात मराठा क्रांती मोर्चास हात दिला होता. हा मोर्चा सकाळी 11 वाजता सोलापुरातील श्री छत्रपती संभाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला आहे.
याप्रसंगी माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, राजेंद्र पाटील,पप्पू स्वामी,औदुंबर वाडदेकर, दीपक सुडके,माऊली कौंडूभैरी,हर्षद डोरले, संभाजी घुले,गणेश गावकरे, दिगंबर यादव यांच्यासह अन्य काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
या मोर्चामध्ये ग्रामीण भागातून आंदोलक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता असल्याने ग्रामीण पोलिसांनी कोल्हापूर, सांगली येथून बंदोबस्त मागविण्यात मागवला आहे. तालुक्याच्या ठिकाणी साखळी पद्धतीने हा बंदोबस्त आहे.
सोलापूर शहराकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरती हा बंदोबस्त असून प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. शनिवार, रविवारी संचारबंदी असल्याने अत्यावश्यक कामासाठीच वाहनांना प्रवेश दिला जात आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आ.समाधान आवताडे यांना कार्यकर्त्यांसह अटक करण्यात आले. pic.twitter.com/iCvppqxf92
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) July 4, 2021
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी या बंदोबस्ताचे सकाळी पाहणी केली. सोलापूर शहरातील पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
सोलापूर व दौंड एसआर पीएफच्या तुकड्यांची या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच लातूर उस्मानाबाद या ठिकाणाहून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज