मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोशल मीडियाचा वापर करून पोलीस प्रशासनाने थेट नागरिकांशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न केला आहे. अर्थात गुन्हेगारांसह अवैध धंद्यांची माहिती एक क्यूआर कोड स्कॅन करून थेट पोलिसांना देता येणार आहे.
हा अभिनव उपक्रम वर्धा जिल्ह्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.वंदना कारखेले यांनी उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना आपल्या भागात होणारी गुन्हेगारी, अवैध धंदे यांची माहिती देण्यासाठी थेट उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधता येईल.
वर्ध्याच्या पुलगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून डॉ. वंदना कारखेले या रुजू झाल्या आहेत. महिला अधिकारी म्हणून रुजू होताच त्यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे.
डॉ. वंदना कारखेले यांनी यासाठी एक क्युआर तयार करत टेलिग्रामच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाणार आहे. परिसरात होणारी अवैध वाळू वाहतूक, दारू विक्री, अवैध कृत्य यासंह जिल्ह्यातून तडीपार केलेले गुंड आढळून आल्यास यांची तातडीने माहिती नागरिकांनी याच्या माध्यमातून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माहिती देणाऱ्याचे नाव राहणार गुप्त
दरम्यान क्यूआर कोड स्कॅन करून माहिती पोलिसांना देता येणार असून नागरिकांकडून कोणतीही माहिती देताच त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. यासह तात्काळ कारवाई केली जाईल असं डॉ वंदना कारखेले यांनी सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कारखेले यांनी सुरु केलेल्या नागरिक संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुन्हेगारी करणाऱ्यांवर अंकुश लावता येईल. यासह नागरिकांना थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येईल.
नागरिकांना आवाहन
जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात ही संकल्पना राबविण्यात आली आहे.उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सुरु केलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे या उपक्रमाची सगळीकडे चर्चा आहे.
पुलगाव उपविभागाअंतर्गत गुन्हेगार, अवैध व्यावसायिक व महिला, तरुणी यांच्याशी अश्लील वर्तन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याच्या उद्देशाने ही संकल्पना रबविण्यात आली असून नागरिकांनी या माध्यमातून माहिती देण्याचा आवाहन डॉ. कारखेले यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज