टीम मंगळवेढा टाईम्स ।
माण नदीपात्रातून बेकायदा वाळू वाहतूक करणारी दोन वाहने कारवाई न करता सोडून दिल्या प्रकरणात निलंबीत झालेले
वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार अर्जून मुळे यांची उचलबांगडी ग्रामीण पोलिस मुख्यालयात केली असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.
पोलिस हवालदार अर्जून मुळे हे मंगळवेढा पोलिस ठाण्यात वाहतूक शाखेकडे कार्यरत होते.
दि.७ जुलै रोजी सांगोला तालुक्यातील माण नदीपात्रातून एक डमडम व टिपर अशी दोन वाहने बेकायदा वाळू घेवून लक्ष्मी दहिवडी परिसरात आली होती.
या दोन वाहनावर कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित असताना मुळे यांनी ती वाहने पोलिस ठाण्यापर्यंत आणूनही कारवाई न करता मध्यरात्री सोडून दिल्याची तक्रार पोलिस अधिक्षक यांच्याकडे एका सुज्ञ नागरिकाने केली होती.
या घटनेची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर कर्तव्यात बेजबाबदारपणा दाखवून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका पोलिस अधिक्षकांनी ठेवून त्यांना तात्काळ निलंबीत करण्यात आले होते.
तदनंतर मंगळवेढा पोलिस ठाण्यातून मुळे यांची उचलबांगडी थेट पोलिस मुख्यालयात करण्यात आली असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज